ATF-MAHARASHTRA चे संकेतस्थळ
नमस्कार मित्रांनो, 'सुलभका'च्या भुमिकेतून लेकरांचे शिकणे सुलभ करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकबांधवांकडून वर्गावर्गातून तसेच परिसरातून दिले जाणारे आनंददायी, कृतीयुक्त अध्ययन अनुभव या 'ब्लॉग'च्या माध्यमातून वेळोवेळी प्रसारित करण्याच्या हेतुनेच हा ब्लॉग निर्मीती प्रपंच. काही सुचना असल्यास अवश्य कळवा..स्वागत आहे.
Pages
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
- नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन
- मराठीतून विज्ञान शिक्षण
- सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन
- अरविंद गुप्ता-दि टॉय मेकर
- नेट शिका डॉट कॉम
- यू कॅन लर्न एनीथिंग
- सानेगुरूजींचे साहित्य
- मराठी शाळा डॉट इन
- मराठी विश्वकोष
- शब्दक्रीडा दालन
- मराठी ई-पुस्तके.
- मराठी इंटरनेट
- ऑनलाइन नवोदय चाचणी
- इयत्ता १ ते ८ साठी प्रश्नसंच (psm)
- PSM प्रशिक्षण नोंदणी प्रपत्र
- अवकाशवेध
- पालकनीती
- बालनगरी
- शासन निर्णय
- बालभारती
- दि फ्री मॅथ्स
- गणित स्रोत
- शिक्षक कट्टा
- क्वेस्ट
- नवोपक्रमशील शाळा व शिक्षकांच्या माहितीचे प्रपत्र
- ATF-MAHARASHTRA
- WE LEARN ENGLISH-RADIO PROGRAMMES
Monday, 12 October 2015
सुलभक:किशोर काठोले आणि टीम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोजने.
तानसा अभयारण्यात प्रत्यक्ष जाऊन साजरा केला वन्यजीव सप्ताह.
आपल्या पाठ्यपुस्तकांमधे अनेक पाठ मानव व निसर्ग यांचे नाते सांगणारे आहेत. पण हे पाठ बहुदा पाठ्यपुस्तक व चार भिंतीच्या पलिकडे नाही जात.
ह्या सगळ्या पलीकडे जायला हवे. मी बर्याचदा संधी मिळेल तेव्हा वर्गाबाहेर जातोच. त्यातलाच हा एक नमुनआमच्या मोज शाळेपासुन दिड किलोमिटर अंतरावर तानसा अभयारण्याची हद्द सुरू होते. दर वर्षी गावातील वनपाल शाळेत येऊन वन्यजीव सप्ताहा बद्द्ल शाळेत मुलांशी बोलायचे. या वर्षी आम्ही सर्व शिक्षकांनी मिळुन जरा वेगळ्या पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले.
गावातच राहाणाऱ्या वनपालांशी चर्चा केली. ठरल्या प्रमाणे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच शाळेतुन सर्व शिक्षक, वनपाल व ईयत्ता 5,6,7,8,ची सगळी मुलं जंगलात निघालो. एरवी काहीना काही निमित्ताने जंगलात फिरणारी ही आमची मुलं आज भलतीच उत्साहात होती. काही अंतर चालल्या नंतर मधेच थांबुन वनपालांनी मुलांचे दोन गट केले व स्वतः मधे उभे राहुन मुलांना ते म्हणाले की एक गट हा राखिव जंगलात आहे तर एक गट संरक्षित जंगलात. पुढे त्यांनी प्रादेशिक वनांची माहिती देऊन आपल्या अभयारण्याचे क्षेत्र किती?, किती तालुक्यांत ते पसरले आहे? याची कल्पना दिली.
पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. काही अंतर चालल्यावर एका झाडाच्या सावलीत सगळे जमलो.आता वनपालांनी वन्यजीवांची गणना कशाप्रकारे केली जाते?, हे सविस्तर समजावुन सांगीतले, त्याच्याच जोडीला पर्यावरण संतुलनासाठी वन्यजीवांचे अस्तित्व कसे महत्वाचे आहे यावर चर्चा झाली. साधारण पणे जंगलाचा जास्तीत जास्त परिसर नजरेस येईल अशा एका टेकडीवर वनपालांची संरक्षक कुटी आहे तिथे सगळेजण पोहचलो. आता कुटीसमोरच्या झाडांच्या सावलीत बसुन पुन्हा गप्पांचा कार्यक्रम रंगला. जंगलातुन कशाप्रकारे रोजगार मिळतो?, कोणती वनौषधी उपलब्ध होते?, जंगल संरक्षण व जंगल आभ्यासाची काय गरज आहे?, मानव व निसर्ग यांचे काय नाते आहे?, या आणि ईतर अनेक विषयांवर वनपालांना मुलांनी बोलतं केलं. तिथेच शाळेतील शिक्षकांनी वनपालांचे आभर मानले आणि वनपालांनीही मुलांना पुन्हा जंगलात येण्याचे अव्हाऩ केले.
विद्य़ार्थ्यांच्या अल्पोपहारासाठी नेलेल्या खाउचे कागददेखील मुलांनी वेचुन घेतले. एकुणच जंगलात फिरतांना वन्यजीवांच्या या घरी आपण पाहुणे म्हणुन आलोय तर आपण येथे कसे वागावे याचा उत्तम पाठ मुलांनी आपल्या कृतीतुन दाखवला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे। या उक्ती प्रमाणे आपल्या सग्या सोयऱ्यांना आज प्रत्यक्ष भेटुन आल्याचा आनंद एवढं चालुन सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता.
शब्दांकन- श्री.पुंढलीक पाटील,संजय फराड,गुरुनाथ काळे,सुरेश ठाकरे,रोहिदास वाघ,किशोर काठोले.

Friday, 9 October 2015
सुलभक:फारूक एस.काझी. जि.प.प्रा.शाळा , अनकढाळ नं .1 ता.सांगोला , जि.सोलापूर

आज सकाळी (दि. 10/10/2015) धावण्याची स्पर्धा झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे एक नवीन गणिती खेळ खेळण्याची वेळ होती. मुलांचा आग्रह असतो की जो भाग चुकतो तोच घ्यायचा. ... पायाभूत चाचणीत तोंडी परीक्षा घेताना असं लक्षात आलं होतं की काही मुलांना घड्याळ नीटसं समजलेलं नाही. त्यामुळे नेमके किती वाजून किती मिनीटे झाली? त्याला व्यावहारिक भाषेत काय म्हणायचं ? हे नीटसे समजलेले दिसले नाही. .. आज वर्गातलं घड्याळ सोडून आम्ही जिवंत घड्याळाचा प्रयोग करून पहायचं ठरवलं होतं. 12 मुलींच्या पाट्यांवर 1 ते 12 अंक लिहून त्यांना घड्याळातील अंकाप्रमाणे उभारायला सांगितलं. तसेच दोन अंकांच्या मधे पाच रेषा ओढत ओढत मिनीटांची सूचक खूण हे सांगितलं. .. तीन काट्यांची निवड करून त्यांना गोलात घेतलं. (साधारणत: घड्याळ गोलाकार असतं म्हणून आकार गोल घेतला) मुलांची उत्सुकता शिगेला पोचलेली. सेकंद काट्याला न सांगताच तो पळू लागला. कारण सेकंद काटा सतत पळत असतो. ह्यातून सेकंद अन मिनटाचा संबंध स्पष्ट करून सांगता आला. सेकंद काटा फिरत असताना मिनीट काटा त्याच्याबरोबर पुढे पुढे सरकत होता. .. .. यातूनच 1 मिनट = 60 सेकंद हे समोर पाहता आलं. मिनट काट्याबरोबरच तास काटा हा पुढे पुढे सरकू लागला. मिनीट काटा जेव्हा तीनवर गेला ते़व्हा तास काटा दोन अंकांच्या मधे येऊन थांबला. 30 मिनीटे = अर्धा तास हे समजून घेता आला. काही मुलांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह होतं...त्यांना तीच कृती पुन्हा करून दाखवली. .. 2 वाजून 30 मिनीटे यालाच व्यावहारिक भाषेत "अडीच वाजले" असे म्हणतात . आता अंक झालेल्या मुलीही उत्साहाने उत्तरं देऊ लागल्या हेत्या. .. पाहता पाहता सव्वा, अर्धा, पाऊण ह्यातून जाऊन पूर्ण वाजणे समजू लागलं. .. परंतु हे एवढ्याने थांबणार नव्हतं. @वर्गात चांगलं घड्याळ येणा-या मुलांनी घड्याळ न समजणा-या मुलांबरोबर जोडी बनवून "किती वाजले?" हा खेळ खेळावा. @काय आहे या खेळात ? आपल्या जोडीदाराला अधून मधून किती वाजले ? हे विचारत रहायचं. व्यावहारिक भाषेत त्याला काय म्हणायचं ? हे ही विचारायचं. जर समजलं नसेल समजाऊन सांगा. वर्गातील घड्याळाचा त्यासाठी वापर करता येईल. .. @घड्याळाशी संबंधित उदाहरणे. आज आम्ही तास मिनीटे हे रूपांतर घेतले. मुलांच्या चूका ग़ृहित धरून ही गणितं घेतली होती.आणखी दोन तीन तासिका यासाठी खर्ची पडतील.त्यानंतर बेरीज व वजाबाकीचा विचार करता येईल. ..
अनुभव :
1) आजच्या या जिवंत घड्याळाने घड्याळ केवळ भिंतीवर किंवा हातातच नाही तर समोर असं जिवंत आकडे अन जिवंत काट्यांच्या मदतीनेही शिकता येते ही मज्जा अनुभवली.
2) सेकंद,मिनीट व तास काट्यांची जिवंत कृती पाहून किती वाजून किती मिनीटे याचे कोडं सहजी सुटलं. दुसरीची मुलंही उत्साहाने भाग घेती झाली.
3) व्यावहारिक भाषेत काय म्हणायचं ? हा ब-याचदा अडणारा मुद्दा आज जरा सोपा झाला.आणखी सरावाने तो अजून सोप्पा होईल.
4) रूपांतर ही औपचारिक क्रिया या अनुभवाला जोडून घेतल्याने ती फारशी जड वाटली नाही. मस्त एन्जॉय केलं त्यांनी ....माझ्यासकट
5) गणित शिकण्याच्या पध्दतीत याचा उपयोग करून मला गणिताच्या जवळ जाता आलं हे माझ्यादृष्टीने शिकणं होतं. 6) किती वाजले ? हा नवीन पाठ आम्ही पाठ्यपुस्तकात ॲड करतोय. सहजपणानं घड्याळ उलगडेल म्हणून.
7) हा अनुभव घेताना मुलांनी दाखवलेला उत्साह चकित करणारा होता. कोणताच विषय अवघड नसतो,त्रूट असते ती आपल्या पध्दतीत. आज ती थोडी बदलून पाहिली.(माझं शिकणं) .
. फारूक एस.काझी. जिपप्रा शाळा , अनकढाळ नं .1 ता.सांगोला , ज्.सोलापूर
Wednesday, 7 October 2015
सुलभक:गजानन बोढे,जि.प.प्रा.शाळा भानुसेवस्ती,ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.
-गजानन बबनराव बोढे,सहशिक्षक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानुसेवस्ती (टाकळी जिवरग),
Angles & Triangles (कोन व त्रिकोण)
Std-5th(semi english medium)
SSubject-Mathematics Unit-Angles & Triangle.
Teaching aid-Ladder & Slide in the school yard.
Angles & Triangles (कोन व त्रिकोण) ह्या संकल्पनांच्या दृढीकरणासाठी मला पारंपारिक शैक्षणिक साधनांच्या तुलनेत शाळेच्या आवारातील घसरगुंडीचा वापर अधिक परिणामकारक ठरू शकेल असे वाटले.
चार भींतीच्या आड रोज त्याच त्या खडुफळ्यांचा वापर करण्याचा खरेतर मलाच कंटाळा आला होता.
ममग काय,"चला पोरांनो आवारात घसरगुंडीकडे..आपण काहीतरी शिकुया..!" असे म्हणून आवारात आलो..
पोरांना आपण नेमके काय शिकणार आहोत याची पूर्वकल्पना जाणीवपूर्वक दिलेली नव्हती..त्यामुळे पोरांच्या चेह-यावर कमालीची उत्सुकता दिसत होती.त्यांच्यातील शिकण्याच्या उत्सुकतेचा लाभ घेण्याचे ठरवून सुलभकाच्या भुमिकेतून पुढील कृतीचे आयोजन केले.
पोरांकडून angle म्हणजे 'कोन' व triangle म्हणजे 'त्रिकोण' असे घोकुन न घेता घसरगुंडीचे दोन सरळ खांब म्हणजे line segments ज्या एकाच ठिकाणी परस्परांना जोडलेले आहेत त्या ठिकाणाकडे अंगुलीनिर्देश करुन त्यास vertex (कोनाचा शिरोबिंदु) व त्यामुळे तयार झालेल्या कोप-याला angle (कोन) म्हणायचे..असे पोरांना सुचवले. बस्स..मी फक्त एवढेच केले..मग पोरं स्वत:च घसरगुंडीच्या विविध भागात दिसणारे vertex व angles मला दाखवायला व सांगायला लागलीत..याचपद्धतीने पुढे Triangle व Elements of Triangle हे संबोध स्पष्ट केलेत.त्यासाठी खांबांवर खडुने रेषाखंड काढून घेतले व सोयीसाठी त्यावर points दाखवून त्यांना इंग्रजी A,B,C अशी नावे दिलीत व संबंधीत आकृत्यांचे वाचन कसे करायचे हे समजावून सांगितले..संबोध स्पष्ट झालेत कि नाही याची चाचपणी करण्यासाठी पोरांना वहीवर Angles व Triangles काढून त्यांचे विविध पद्धतीने वाचन व लेखन करावयास दिले...तपासणीअंती पोरांनी आकृत्यांचे अगदी अचूक वाचन/लेखन केल्याचे मला दिसले..हीच माझ्या अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती...
या तासिकेत पोरांना पुढील बाबींचे आकलन झाले..
1.Angles
2.Elements of angle.
3.Triangle
4.Elements of Triangle.
5.Different methods of reading/writing Angles & Triangles.

Tuesday, 29 September 2015
सुलभक:सुरेश सुतार,जि.प.प्रा.शाळा बारे,ता.भोर,जि.पुणे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारे,ता.भोर,जि.पुणे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वर्गातील मुले आणि मी......
आज आम्ही ( मी व इ.3 री व 6 वी ची मुले ) दुपारनंतर एक तास गावातील एका किराणा दुकानास भेट दिली.
तेथे दुकानदार काकांकडून मुलांनी खूप काही गोष्टी जाणून घेतल्या.जाण्याआधी थोडी पूर्वतयारी करूनच गेलो होतो.
गेल्यावर दुकानदार श्री.योगेश दानवले यांनी आमचे स्वागत केले..
नंतर मुलांनी खालील मुद्द्यावर प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.
● काकांचे नाव
●दुकानाचे नाव.
●दुकानातील वस्तूंची नावे.
●या वस्तू कोठून आणता .
●वस्तू आणण्यासाठी वाहतुकीचे साधन.
●दुकान व्यवसायात आणखी कोण कोण मदत करते .
●वस्तूंच्या किंमती. .... वगैरे वगैरे प्रश्न विचारून मुलांनी माहिती जाणून घेतली.
प्रत्यक्ष काही वस्तूंचे वजनही (साखर, डाळ, शेंगदाणे, कडधान्ये इत्यादी यांचे) केले ..... खरंच. ... मुलं या दुकानात कधी घरच्यांबरोबर कधी एकटी खरेदी च्या निमित्ताने आली असतील ही पण आज सर्वांबरोबरचा अनुभव त्यांचा खूप छान होता.. हे जाणवले.
दुकानदार योगेश काकांची अनौपचारिक मुलाखत ... चर्चा. .. काही प्रात्यक्षिक.... काही हिशोब... वगैरेंचा अनुभव या पाऊण एक तासात मुलांना आणि पर्यायाने मलाही खूप काही शिकवून गेला .
इ 3 री च्या परिसर अभ्यासातील घटकाच्या अनुषंगाने तसेच मुलांना गणिती क्रिया, हिशेब , दुकानातील व्यवहार वगैरे प्रत्यक्ष अनुभव आणि शिक्षण व व्यवहार यांची सांगड घालण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.... शेवटी काकांनी मुलांना त्यांच्या तर्फे चॉकलेट , बिस्किटे दिली मग काय ..मुले जाम खुश ..... काकांनी आम्हाला वेळ( आणि खाऊ) दिल्याबद्दल मुलांनी त्यांचे आभार मानले..... एक वेगळा छान प्रत्यक्ष अध्ययन अनुभव घेवून मुले(आणि मीही) आनंदात पुन्हा शाळेकडे आलो.
-सुरेश सुतार

Subscribe to:
Posts (Atom)