Tuesday 29 September 2015

सुलभक:सुरेश सुतार,जि.प.प्रा.शाळा बारे,ता.भोर,जि.पुणे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारे,ता.भोर,जि.पुणे. 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

वर्गातील मुले आणि मी...... 



आज आम्ही ( मी व इ.3 री व 6 वी ची मुले ) दुपारनंतर एक तास गावातील एका किराणा दुकानास भेट दिली.
तेथे दुकानदार काकांकडून मुलांनी खूप काही गोष्टी जाणून घेतल्या.जाण्याआधी थोडी पूर्वतयारी करूनच गेलो होतो.
गेल्यावर दुकानदार श्री.योगेश दानवले यांनी आमचे स्वागत केले..
नंतर मुलांनी खालील मुद्द्यावर प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.
● काकांचे नाव
●दुकानाचे नाव.
●दुकानातील वस्तूंची नावे.
●या वस्तू कोठून आणता .
●वस्तू आणण्यासाठी वाहतुकीचे साधन.
●दुकान व्यवसायात आणखी कोण कोण मदत करते .
●वस्तूंच्या किंमती. .... वगैरे वगैरे प्रश्न विचारून मुलांनी माहिती जाणून घेतली.
प्रत्यक्ष काही वस्तूंचे वजनही (साखर, डाळ, शेंगदाणे, कडधान्ये इत्यादी यांचे) केले ..... खरंच. ... मुलं या दुकानात कधी घरच्यांबरोबर कधी एकटी खरेदी च्या निमित्ताने आली असतील ही पण आज सर्वांबरोबरचा अनुभव त्यांचा खूप छान होता.. हे जाणवले.
दुकानदार योगेश काकांची अनौपचारिक मुलाखत ... चर्चा. .. काही प्रात्यक्षिक.... काही हिशोब... वगैरेंचा अनुभव या पाऊण एक तासात मुलांना आणि पर्यायाने मलाही खूप काही शिकवून गेला .
इ 3 री च्या परिसर अभ्यासातील घटकाच्या अनुषंगाने तसेच मुलांना गणिती क्रिया, हिशेब , दुकानातील व्यवहार वगैरे प्रत्यक्ष अनुभव आणि शिक्षण व व्यवहार यांची सांगड घालण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.... शेवटी काकांनी मुलांना त्यांच्या तर्फे चॉकलेट , बिस्किटे दिली मग काय ..मुले जाम खुश ..... काकांनी आम्हाला वेळ( आणि खाऊ) दिल्याबद्दल मुलांनी त्यांचे आभार मानले..... एक वेगळा छान प्रत्यक्ष अध्ययन अनुभव घेवून मुले(आणि मीही) आनंदात पुन्हा शाळेकडे आलो.

-सुरेश सुतार



Sunday 20 September 2015

सुलभक:गजानन बोढे,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती (टाकळी जिवरग) ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.


INTRODUCING LINE

Add caption
(September 14,2015) 
आज आम्ही (इयत्ता २ री चे विद्यार्थी) हे शिकलोत.
 *दोरी दोन्ही बाजूंनी ताणली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Straight Line.
 *ताणलेली दोरी सैल सोडली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Curved Line. ...................................................................................................................
.*ताणलेली दोरी आडवी धरली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Horizontal Line. 
*ताणलेली दोरी उभी धरली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Vertical Line. 
 *ताणलेली दोरी तिरपी धरली अन् म्हटले...Slanting Line.

Tuesday 15 September 2015

Sliding & Rolling.

इयत्ता २ री (सेमी इंग्रजी).
घटक-SLIDING & ROLLING.
.................................................
इयत्ता २ रीच्या गणित पाठ्यपुस्तकात असलेले FLAT surface व CURVED surface हे संबोध विविध वस्तुंच्या सहाय्याने पोरांना आधीच समजावून सांगितले होते. पूर्वज्ञानाचा हाच धागा पकडून आपण आता काय शिकणार आहोत याची पूर्वकल्पना न देता मधल्या सुट्टीत घसरगुंडीजवळ खेळत असलेल्या लेकरांजवळ गेलो.इयत्ता २ रीतील पोरांपैकी एकाला घसरगुंडीवर चढण्यास सांगून आधी पुस्तक (an object with FLAT surface) घसरपट्टीवरून खाली सोडण्याची सुचना केली.
त्यानंतर एक खडू (an object with CURVED surface) आडवा ठेवून घसरपट्टीवरुन सोडण्यास सांगितले.या दोन भिन्न surfaces असलेल्या वस्तुंच्या घसरपट्टीवरून खाली येण्याच्या पद्धतीचे निरिक्षण करावयास सागून त्यात काही फरक दिसलाय का ते पोरांना विचारले..पोरं विचार करु लागलीत..शेवटी जीवनने अचूक निरिक्षण नोंदवले.तो म्हणाला,"सर,पुस्तक खाली येताना पट्टीला घासत आले,परंतु खडू मात्र गोल गोल फिरत पट्टीवरुन खाली आला..!"
...यावरुन घसरपट्टीवरुन/उतारावरुन एखादी वस्तू घासत येण्याला SLIDING अन् गोल गोल फिरत येण्याला ROLLING म्हणतात हे सांगितले...सोबतच FLAT surface असलेल्या वस्तू SLIDING करतात अन् CURVED surface च्या वस्तू ROLLING करतात
हे या कृतीदरम्यान पोरांच्या लक्षात आले ते पुढील प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनच काढून घेतल्यामुळे.
Q1-What surface do a BOOK have?
Ans by students-FLAT surface.
...................................................
Q2-BOOK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans by students-SLIDING करत.
...................................................
Q3-What surface do a chalk have?
Ans by students-CURVED surface.
...................................................
Q-4-CHALK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans-ROLLING करत.
...................................................
पोरांना हे संबोध समजलेत की नाही याची चाचपणी करण्यासाठी पुढील प्रश्न विचारले.
Q-5-SLIDING करत येणारे OBJECTS सांगा?
Ans by students-कंपासपेटी,फरशीचा तुकडा,वीट,वही...
...................................................
Q5-ROLLING करणारे OBJECTS सांगा.
Ans by students-बॉल,बैलगाडीचे चाक,पाण्याची बॉटल,जेवणाचा डबा,पोळ्या लाटण्याचे लाटणे.
...................................................
...अशाप्रकारे मधल्या सुट्टीत खेळासोबतच पोरांचे 'शिकणे'ही घडले.


गंमतीदार अनुभव...इयत्ता १ लीतल्या चिमुकल्यांचा.

इयत्ता १ली (सेमी इंग्रजी) च्या लेकरांना Addition ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी 'power point presentation'प्रणालीद्वारे काही slides तयार केल्या अन् एलसीडी प्रोजेक्टरच्या मदतीने सादरीकरण केले.स्लाईड्स मधील apple च्या चित्रांना bounce हा animation effect दिलेला असल्याने प्रत्येक क्लिकनंतर एक एक apple चेंडुसारखे उसळ्या घेत घेत पडद्यावर स्थिर व्हायचे.दरम्यान जो गमतीदार प्रसंग अनुभवलाय तो संवाद स्वरूपात देण्याचा मोह होत आहे.
'3+2=5'
या उदाहरणात सर्वप्रथम 3 apples क्रमाक्रमाने उसळ्या घेत (पोरांच्या शब्दांत,'कुदत कुदत..')' पडद्यावर स्थिरावले..
माझा प्रश्न-count the apples..
विद्यार्थी(सामुहिक उत्तर)One apple..2 apples...3 apples..
नंतरच्या क्लिकवर plus हा शब्द पडद्यावर झळकला व पुढे परत 2 apples क्रमाने उसळ्या घेत अवतरले..
माझा प्रश्न-count the apples..
विद्यार्थी(सामुहिक उत्तर)-One apple,,2 apples..
...त्यानंतर त्यांनाच पडद्यावरील सर्व apples मोजण्यास सांगितले व मी प्रश्न केला,"How many apples altogether..?"
..लेकरं पुन्हा मोजायला लागलीत,"1 apple,2 apples,3 apples,4 apples,5 apples..!"
..हे सर्व सुरू असतांना 'is equal to'या शब्दांनंतर पुढील क्लिकवर क्रमाक्रमाने 5 apples उड्या मारत मारत पडद्यावर झळकले तेव्हा मी लगेच प्रश्न केला,"इथे 5 apples कसे आलेत...?"
यावर पोरांनी दिलेलं सामुहिक उत्तर,...."सर, 'कुदत कुदत' आले...!"

Dec 13, 2014.

एक अनुभव असाही.

इयत्ता ५ वी (सेमी इंग्रजी) च्या विद्यार्थ्यांना Natural Resources..या General Science मधील घटकाच्या अध्यापनादरम्य्न Types of Soil/clay सांगत असताना पाठ्यपुस्तकात नमुद असलेल्या दोन प्रकाराबाबत माहिती दिली व Types of soil (clay)..या मथळ्यांखाली ते दोन प्रकार १.China Clay २.Multani Clay या क्रमाने फळ्यावर लिहीले.
परंतु पोरांनी सभोवतालच्या परिसरात स्वतः बघितलेल्या मातीचे आणखी तीन प्रकार मला सुचवले व फळ्यावरील types of soil च्या यादीत भर पडली.
पवनने त्याच्या मामा्च्या गावात लाल रंगाची माती असल्याचे सांगुन स्वतःच त्या मातीप्रकाराचे Red Clay असे नामकरण केले.
गणपत,श्रीराम व सिद्धेश्वरने त्यांच्या शेतातील व शाळेच्या लगतच्या शेतजमीनीतील मातीचा रंग काळा असल्याचे निरीक्षण नोंदवून त्या मातीप्रकाराचे नामकरण Black Clay असे केले.. तर महेश कि जो ३ किमी अंतरावरील एका गावातून माझ्या शाळेत येतो, त्याने त्याच्या गावाशेजारील डोंगराच्या परिसरात मुरमाड माती असल्याचे सांगुन त्या मातीच्या रंगावरून (त्याने यासाठी वापरलेला मराठी प्रतिशब्द शब्द 'भुरकट माती'..) Brown Clay असे नामकरण केले.
पोरांनी सुचवलेल्या मातीप्रकारांना फलकलेखनात पुढीलप्रमाणे स्थान दिल्याने त्यांना झालेला आनंद अवर्णनीयच होता.

Types of Clay/Soil

1.China clay
2.Multani Clay
3.Black Clay
4.Brown Clay
5.Red Clay.

December 19, 2014 at 11:22pm

इयत्ता ५ वीत असताना गतवर्षी श्रीराम भानुसे या विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या संचालकास लिहिलेले पत्र.

इयत्ता ५ वीतल्या श्रीरामने पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालकांना लिहीलेले हे पत्र त्याने कागदावर लिहीलेल्या मुळपत्रातून जसेच्या तसे त्याच्याच शब्दात येथे देत आहे.
(मोबाइल कँमे-याच्या तांत्रिक मर्यादेमुळे पत्राची फोटोकॉपी अस्पष्ट असल्याने त्यातील मजकूर टाइप करून इथे देत आहे)
............................................................................
प्रति
मा.संचालक साहेब,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे.
विषय-पुढल्या वर्षी इयत्ता ५ वीच्या General Science च्या पुस्तकात Types of clay च्या यादीत आमच्या परिसरातील black clay, red clay व brown clay या मातीप्रकारांना समाविष्ट करून घेण्याबाबत.
महोदय,वरील विषयी सविनय विनंती येणेप्रमाणे आहे कि सरांनी आम्हाला General Science च्या पुस्तकातील Natural Resources हा पाठ शिकवताना मातीचे दोनच प्रकार सांगितले.त्यामध्ये सरांनी China clay व Multani clay याची माहिती सांगितली.त्यांना आम्ही म्हणालोRed clay, Brown clay, Black clay या माती पुस्तकात कां बरे नाहीत?.. सर म्हणाले,Red clay माती कोठे आहे? पवन म्हणाला माझ्या मामाच्या गावाला आहे.सर म्हणाले Brown clay कोठे आहे?सिद्धेश्वर म्हणाला माझ्या विहीरीजवळ आहे, महेश म्हणाला माझ्या गावाजवळच्या डोंगराजवळ आहे.सर म्हणाले Black clay कोठे आहे?आम्ही म्हणालो शाळेच्या पाठीमागे आहे.सर म्हणाले मला या clay चे नमुने द्या.आम्ही म्हणालो हो.
संचालक साहेब हे पत्र स्विकार करावे.संचालक साहेब पुढील अभ्यासक्रमात हे clay टाकावे.ही माझी नम्र विनवणी.

आपला विश्वासू
श्रीराम अजिनाथ भानुसे,इयत्ता ५ वी.
शाळेचे नाव-जि.प.प्रा. शाळा भानुसेवस्ती, टाकळी जिवरग. पो-कायगाव ता. सिल्लोड. ज.औरंगाबाद.

December 20, 2014 at 3:12pm

गतवर्षी ३ रीत शिकणा-या सौरभ भावले या चिमुकल्याची काव्यरचना.

सौरभ धोंडीराम भावले...३रीत शिकणा-या माझ्या या विद्यार्थ्याने कागदावर जे लिहिलंय ते जसेच्या तसे त्याच्याच शब्दांत टंकलिखित करून येथे प्रसारीत करण्याचा मोह होतोय..

"..फुलपाखरू...

कधी उडशील कधी जागशील फुलपाखरा..
कधी तु कवळ्याशा उन्हात खेळशील..
तेव्हा मजेत खेळशील, तुझ्यासंगे मी भी खेळेल.. फुलपाखरू,तु तुझ्या कधीभी कामात राहतो.तुझे पंख गोजीरवाणे आहेे.
तु फुलांवर खेळतो.फुलपाखरा तु कदीभी फिरायला जातो. मला तेव्हा खेळु देशील का?
मी तुला पाहतो तेव्हा तु उडून जातोस.तु कवळ्याशा उन्हात बसतोस. इवलेसे पंख छान फळफळतोस.

लेखक/कवी-सौरभ.
December 27, 2014 at 9:37pm