Thursday 24 December 2015

सुलभक:सोमनाथ वाळके जि.प.प्रा.शाळा पारगाव जोगेश्वरी ता.आष्टी,जि.बीड


चला अंतराळात जाऊ या. आज सहावीच्या वर्गातील प्रवीणने प्रश्न विचारला आकाश आणि अंतराळ यामध्ये फरक काय ? ही चर्चा रंगत गेली. मग काय अंतराळ, अंतराळवीर, विविध देशांच्या अंतराळ मोहिमा यावर मुलांना शक्य तितकी माहीती दिली. मुले खुपच एक्साइट होऊन आणखी प्रश्न विचारत होती ,मीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे शंका समाधान करीत होतो. अंतराळातील झिरो gravity ही आईडिया मुलांना खुपच भन्नाट वाटली परंतु त्याबद्दल त्यांना प्रॉपर आकलन होत नव्हते. मग यावर उपाय म्हणजे मुलांना डिजिटल क्लास मध्ये नेऊन मोठ्या पडद्यावर Gravity हा हॉलीवुड चित्रपट दाखविला मुले खुपच तल्लीन आणि एक्साइट होऊन हा चित्रपट पहात होती अंतराळ अनुभवत होती 5.1 च्या होम थिएटर ने त्यांना प्रत्यक्ष अंतराळात असल्याचा भास होत होता. चित्रपट संपल्यावर वैष्णवी,पूजा,प्राजक्ता,ऋतुजा यांनी भारताच्या मंगळ मोहिमेबद्दल विचारले आणि यान कसे असते, ते कसे उड्डाण करते असे अनेक प्रश्न विचारले. मग अंतराळयानच तयार करायचे ठरले. आणि आम्ही मिळून तयार केले भारताचे मंगळयान. भन्नाट मज्जा आली यान तयार करताना. सर आता हे यान कसे उडवायचे हा मुलांनी विचारलेला प्रश्न. " खुप शिका, मोठे व्हा,आणि हे यान उडविण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र विकसित करणारे शास्त्रज्ञ व्हा" या माझ्या शुभचिंतनासह आमचा अंतराळतास (दिवस) संपला. -सोमनाथ वाळके, जि प प्रा शा जोगेश्वरी पारगाव,ता आष्टी जि बीड. (A MEMBER IN 'ATF-MAHARASHTRA')

सुलभक: धुर्वे प्रमोद जि प प्रा शाळा कर्डीलेवस्ती, कडा. कें.कडा. ता.आष्टी.


काजल अंक ओळखू आणि वाचून लिहू लागली.

काजल (इ.1ली) माझ्या वर्गातील विद्यार्थीनी आहे. तिला खूप प्रयत्न करूनही, ती अंक ओळखत नव्हती. काय करावे म्हणून... एका मोकळ्या ट्रे मध्ये खूपशे मणी टाकले. त्याप्रमाणे अनेकशा एक एक वस्तू तिच्या समोर ठेवल्या. उदा.- काडीपेटी, खडू, पेन, खडे, इ. आणि प्रत्येक वस्तू दाखवून ही 1 आहे, आणि तिचे लेखन 1 असे करतात हे दाखवले. प्रत्येक वस्तू हातात घेवून त्याकडे पाहावे व ती वस्तू मोजून अंकलेखन केले. असे करत ती खूप आनंदाने दररोज वस्तू मोजून अंक शिकली. मला फक्त तिला अंककार्ड व अंक कोणता त्यास काय म्हणावे एवढेच सांगावे लागले. या कृतीतून काजलला खूप आनंद मिळाला. व ती लवकर शिकली.
 याचा मलादेखील खूप आनंद वाटला.












याची प्रेरणा मला आपल्याकडूनच मिळाली... खूप खूप धन्यवाद...!!!!!

Thursday 3 December 2015

सुलभक:फारूक एस.काझी जि.प.प्रा.शाळा,अनकढाळ नं.1 ता.सांगोला ,जि.सोलापूर


**##आजचा भाषिक खेळ##**
 आज (02/12/2015)परिपाठाला सर्व मुलं येऊन बसली. चौथीतल्या प्रीतीने फळ्यावर पेपरमधील 'असहिष्णुता' हा शब्द लिहिला व प्राजक्ताला वाचायला लावला. वाचताना शब्दांबाबत पटकन आकलन न झाल्याने वाचनात अडखळणारी प्राजक्ता शब्द वाचताना अडखळली. नजरेच्या टप्प्यात आलेले शब्द तिला पटकन आकळत नाहीत परिणामी तिच्या वाचनावर परिणाम होतो. ती छान वाचते मात्र अपरिचित शब्दांजवळ मात्र ती घुटमळते व अडखळतेही. आजही ती अडखळली.मी तिला फळ्यावर विष्णू हा शब्द लिहायला लावला.तिने तो लिहिला व वाचलाही.हा परिचित शब्द ती सहज वाचती झाली. मुलांची कुजबूज सुरू झाली.प्रयत्नांनी तिने 'असहिष्णु' हा शब्द वाचला. मला नेहमीच हे वाचनासंबंधीचे प्रश्न खुणावत राहतात.मी यावर एक खेळ खेळूया का हे सुचवलं...मुलं लगेच तय्यार झाली..... "आज आपण 'ष' असलेले जोडाक्षरयुक्त शब्दांचा खेळ खेळायचा. अर्ध्या तासात शब्द शोधायचे ...अन ज्याने त्याने आपला शब्द फळ्यावर लिहायचा." मुलं तयार झाली. सहसा मुलं शब्द सांगतात व शिक्षक तो फळ्यावर लिहितात. इथं मात्र तसं न करता मुलांनी स्वत: शब्द लिहिण्याची अट असल्याने लिहिण्याची मजा व चुका समजून घेणं सहज शक्य होतं. (मंजेच चुकीला फुल्ल माफी. 😃) अर्ध्या तासात आम्ही जवळजवळ 70 शब्द शोधून फळ्यावर लिहिले तेही ज्याचा शब्द त्यानेच लिहावा या नियमाने. ते शब्द इथं देतोय.आपण त्यात वाढ करू शकता. व ते मला पाठवावेत ही विनंतीही करतो. ** ##'ष'चे जोडाक्षरयुक्त शब्द...## ** 1)चौंसष्ट , 2) अष्टचक्र, 3) आकर्षक ,4) सहिष्णुता ,5) असहिष्णुता ,6) कृष्ण ,7)वैष्णवी ,8) मनुष्य ,9) सष्य ,10) बाळकृष्ण ,11) आयुष्य ,12) साष्टांग नमस्कार ,13) गर्विष्ठ ,14) गोष्टी ,15) अडुसष्ट ,16) अष्टकार ,17) हर्षद ,18) उत्कृष्ठ ,19) अष्टप्रधान,20) गोष्ट ,21)पृष्ठ ,22) सरलष्कर , 23) पुष्कळ ,24) राष्ट्रपिता , 25) राष्ट्रवादी, 26) राष्ट्रवाद , 27) अष्टपैलू , 28) कोष्ठक , 29) आकृष्ट ,30) कष्टाळू ,31) नाष्टा , 32) विष्णू 33) कृष्णकांत ,34) अष्टविनायक , 35) उष्णता ,36) कष्ट , 37) दुष्काळ , 38) धनुष्य , 39) अष्टगंध , 40) मार्गशीर्ष ,41) महाराष्ट्र , 42) सदुसष्ठ , 43) संकष्टी , 44) निष्क्रिय ,45) पौष्टिक , 46) बाष्प , 47) राष्ट्र , 48) कष्टात , 49) अष्ट , 50) कृष्णा ,51) दुष्ट , 52) वर्षा ,53) भविष्यकाळ , 54) राष्ट्रवेदी , 55) षष्ठी , 56) कोष्टी , 57) भविष्य , 58) शीर्ष , 59) शीर्षक , 60) अष्टकोन , 61) सृष्टी , 62) दृष्टिकोन, 63) पुष्प , 64) पुष्पा , 65) स्पष्ट , 66) नष्ट , 67) कृष्णानदी, 68) राष्ट्रीय, 69) सहर्ष ,70) दृष्टी. **

**######काही नोंदी######**

 1) इ.2री ते 4 थी पर्यंतच्या मुलांचा सहभाग. 2) मुलांचं वाचन वाढलेलं लक्षात आलं कारण यातील बरेच शब्द दैनंदिन जीवनाचा भाग नाहीत. तरीही त्यांचा समावेश झालाय. 3) 'सष्य' हा शब्द कुठून आणला असं विचारलं तेव्हा तो 'वंदे मातरम ' मधे आहे असं दिगंबरने मत नोंदवलं. 4) शब्द लिहिताना मुलं-मुली चुकले नाहीत (एकदोन अपवाद) यावरून एक गोष्ट लक्षात आली की मुलं समजपूर्वक वाचत असतील तर लेखनात सहसा चुका होत नाहीत. 5) जोडाक्षराचे काही नियम उदाहरणातून समजून घेता येतात. अक्षरांची रचना तसेच त्यांची लिखित चिन्हांकित रचना समजून घेता येते. 6) 'ष' लिहिताना त्याच्यातील तिरपी रेषा ही डावीकडून उजवीकडे तिरपी खालच्या दिशेला येते हे समजताच काही मुलांची पध्दत बदलली. उजवीकडून डावीकडे जाणारी रेषा देणं चुकतंय हे लक्षात येताच बदल सुरू झाला.सरावानं ते अजून पक्कं होईल. 7) मुलांनी वहीत या शब्दांची यादी केली तर मी तेच शब्द कार्डवर लिहायला घेतले. 70 शब्दांचं वाचन साहित्य तयार झालं. 😃 8) शब्दकार्डांमुळे गटातील शब्दांचं दृढीकरण शक्य आहे.त्यासाठी याच शब्दांच्या सरावासाठी विडियो निर्मितीचं काम हाती घेतलंय. तंत्रज्ञानाचा वापर करून सराव अधिक सुलभ होईल. .9) फारशा परिचित नसलेल्या शब्दांची ओळख पटावी यासाठी हे उपयुक्त ठरलं. तसेच मुलांच्या स्मरणकोषातील शब्दांची साठवणूक होताना काय प्रक्रिया होते व त्यासाठी काय करता येईल हे लक्षात यायला मदत झाली.मूल अनुभवाशी संबंधित व उपयुक्त शब्दच लक्षात ठेवतं व अपरिचित शब्दांचं लेखन व वाचनही करताना हमखास चुकतं. 10) अशा उपक्रमात भाषिक खेळ व भाषा शिकण्याची मजा दोन्ही अनुभवता येते. **

** फारूक एस.काझी जि.प.प्रा.शाळा,अनकढाळ नं.1 ता.सांगोला ,जि.सोलापूर

Monday 9 November 2015

सुलभक:धोंडीराम मोरे सर...फळांची माहिती करुन घेऊ..!

फळांची माहिती करून घेऊ (शैक्षणिक )
माझी पहिलीची मुले आज फळांची ओळख करून देत आहेत.मी त्यांना नेहमीची फळे तयार करून रंगवून दिलीत आणि त्या फळासाठी सोपी चारोळीपण तयार करून दिली...त्यानंतर एकेकाने एक ऊभे रहायचे आणि एक फळ हातात धरून चारोळी म्हणायची,या खेळात मुले इतकी रमली तुम्हाला म्हणून सांगतो ....बघा ना प्रत्यक्ष स्वतःच..काय सांगताहेत माझी मुलं......
आंबाःमी आहे आंबा
पिकू द्या थोडं थांबा
फळांचा राजा मी
करा मुजरा म्हणा जी
सफरचंदः मी आहे सफरचंद
रंग माझा लालबुंद
कतरून किंवा कापून खा
डाक्टर पासून दूरा रहा
द्राक्षःद्राक्षांचा पहा घड
चव थोडी आंबट गोड
उंच लटकतो वेलीला
आंबट झालो कोल्ह्याला
केळीःपहा पहा केळी
थोडी हिरवी थोडी पिवळी
सोलून सोलून खा
किंवा शिकरण करून घ्या
अशा छोटी छोटी वाक्य म्हणताना,त्यांची गंमत पाहताना मी माझ्या बालविश्वात फिरून येतो.त्यांच्या रूपाने पून्हा एकदा स्वतःच बालपण जगून घेतो....


Thursday 29 October 2015

सुलभक:संतोष मुसळे:जि.प.प्रा.शा. गुंडेवाडी जि.प.जालना.

माझा उपक्रम स्टिक नेम.

दिनांक:_१५/१०/२०१५ ते २८/१०/२०१५ बदल.
मुले पाचवीतील मात्र बऱ्याच जणांना स्वतःचे नाव इंग्रजीतुन लिहीता येत नव्हते.वेळोवेळी नवनविन प्रकारे मुलांना सांगुण पाहिले माञ,थोडावेळ ती लक्षात ठेवायची व नंतर विसरून जायची.अशातच मला एक नविन संकल्पना सुचली.आईसक्रीम हा लहान थोरांचा आवडीचा विषय. आईसक्रीम आपन ज्या स्टिकने (काडीने) खातो याचाच वापर आपन मुलांना इंग्रजी विषयाची गोडी लावन्यासाठी करायचा.बाजारात ५० काडया १० रुपयाला मिळतात.मी त्या खरेदी केल्या.

    परमानंन्ट मार्करने सुरुवातीला सर्व वीस मुला मुलींचे दोन प्रतीत नावे लिहिली, व ती मुलांना १५/१०/२०१५ रोजी दिली.मुले आनंदाने व उत्साहाने एकमेकास दाखवायला लागली. एक नावाची काडी दररोज सोबत ठेवायची व एक शाळेतच, अवघ्या पाच दिवसात १८ मुलांना एकमेकांची नावे न पाहता लिहीता आली. मग मी याचाच हजेरी म्हणून उपयोग केला वर्गात मुलगा बसला की त्याने आपल्या बाकावर ही छोटीसी नेम पट्टी लावायची म्हणजे कुणी आले तरीही लगेचच ते नाव वाचतील व तो मुलगा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देईल.
    याचा उपयोग मी केवळ मुलांच्या नावापुरताच न करता साधारण: ३०० काडयांवर दोन,तीन,चार अक्षरी इंग्रजी शब्द लिहून एका बॉक्स मध्ये टाकून ठेवलेत ज्या मुलाला जो  शब्द वाचावसा वाटतो तो तिथून घेवून वाचतो व त्याचे लेखन आपल्या वहीत करतो. मागील दहा दिवसात २० पैकी १८ मुलांना १५० शब्द पाठ झालीत.

👉🏻मुलांना इंग्रजी विषयाची गोडी लागली.

👉🏻शब्दसंपत्तीत वाढ व्हायला लागली.

👉🏻चर्चेतुन मुले एकमेकांना शब्द परिचय करून देतायेत.

👉🏻इंग्रजी विषयाची भिती निघून जात आहे.

 

सुलभक:वसंतराव आहेर-जि.प.प्रा.शाळा नवलेवाडी, ता़.अकोले,जि.अहमदनगर..संपर्क:09423387988 **

**माझ्या शाळेतील माझा ज्ञानरचनावाद**

........माझी शाळा जि.प.प्रा.शाळा नवलेवाडी ता.अकोले.जि अहमदनगर..........
मुलांना "आपली ज्ञानेंद्रिये "हा पाठ समजावला .ज्ञानेंद्रियां बद्दल सविस्तर माहिती मुलानी समजून घेतली .......आणि नंतर वर्गातील डिजीटल स्क्रीनच्या वापरातून .......
"Show me Ear......show me tounge.. असा आवाज येतो .असा आवाज आल्यानंतर प्रत्येक मुलाने त्याचा नंबर आल्यावर काठीने ते ज्ञानेंद्रिय दाखवायचे ..आणि इतर मुलांनी आपल्या स्वताच्या त्या ज्ञानेंद्रियावर हात ठेवायचा ......
चार ...दोन वेळा अशी तयारी घेतली की ...मुलांची तयारी पक्की !!!!!!!!!!
 

Saturday 24 October 2015

सुहानीचा प्रवास::सुलभक:कल्पनाताई बंसोड:जि.प.प्रा.शाळा उर्जाग्राम,ता.जि.चंद्रपुर.



प्रेमाची जादू...अनुभव सुहानीचा...


मला आजही आठवतो तो दिवस, नविन शाळेतील पहिला घास .मला तिसरा वर्ग देण्यात आला.मी पहिल्यांदा वर्ग तिसरा शिकवणार होते.वर्गात जाताच विद्यार्थांची प्रगती कशी आहे हे बघण्याVच्या दृष्टीने मी मुलांचे वाचन घ्यायला सुरुवात केली . त्यामध्ये सुहानी नावाची एक मुलगी वाचायला उभी होताच मुले मला सांगू लागली “मैडम, हिला वाचता येत नाही” ,असे म्हणताच ती सर्वांकडे रागाने बघू लागली आणि कहीही न वाचताच खाली बसली .खुप समजावले पण ती वाचायला तयार नव्हती. मी तिला रागावले नाही . काहीही प्रतिक्रिया दिली नाही .दुसर्या दिवशी मी वर्गात गेल्यानंतर मुलांनमध्ये खाली जावून बसले . मुले माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली. “मैडम खुर्ची आंतोण” असे म्हणत पळापळ करू लागली.मी त्यांना बसायला सांगितले.मुले माझ्या भवती गोल करुन बसली होती .मी सुहानी ला म्हटले “सुहानी एकडे ये ,माझ्या जवळ येवून बस ”.असे म्हणताच ती माझ्याकडे खुप रागाने बघू लागली ,जवळ यायचे तर दुरच राहिले. त्यावर मुले मला सांगू लागली “मैडम, तुम्ही तिले मारणार म्हणून थे घाबरत आहे”. मी पुन्हा सुहानीला बोलवले आणि आवर्जुन सांगितले की मी तिला मारनार नाही .तरी ती जवळ येईच ना. तिची बाजुची मैत्रींण तिला धक्का देवुन म्हणाली,”जा की ग, मैडम नाई मारत” त्यावर ती तिला म्हणते कशी “नविन-नविन रायली त नाई मारत ..जुनी झाली त मस्त मारते तुले का माईत हाय” मला तिच्या या प्रतिक्रियेवर काय बोलावे कळेच ना .... शेवटी मीच तिच्याकडे गेले आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.थोड्या वेळातच सुहानीची माझ्याशी गट्टी जमली.मी मनातल्या मनात म्हटले आता जमलं ! मी तिला हळूच एका वर्तुळात एक मूळाक्षर फरशीवर काढून दिले व विचारले हे काय आहे .तीने लगेच उत्तर दिले ‘क’ मग ‘क’ पासून येणारे शब्द तिला सांगायला लावलेत. तिने आपल्या अनुभव विश्वातिल खुप शब्द सांगितलीत. ती शब्द मी फरशीवर लिहिली.त्यानंतर तीच शब्द तिला मी वाचायला सांगितली.तिने सर्व शब्द सहजपणे वाचलीत. कारण ते सारे शब्द तिने स्वतः सांगितले होते .त्यामुळे तिला वाचता आले .मी तिला शाबासकी देवुन म्हटले “अरे तुला तर सारेच वाचता येते .ती खुश झाली आणि म्हणाली “मंग पाहा ना जी मैडम हे पोर माले वाचताच येत नाही मनते”. ती सर्व मुलांना आनंदात सांगू लागली “मला बी वाचता येते काई” .खर तर ती शब्द वाचत नव्हती तर शब्दचित्र वाचत होती .ही तिची सुरुवात होती .तिच्यात आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे होते .त्यासाठी असा प्रयत्न काही दिवस सुरु होता . सुहानी ला वर्गात बसणे फार आवडत नसे.खरे तर ती खुप मुडी होती. तिला तिच्या मुडनुसार घ्यावे लागत असे. त्यामुळे तिला वाटेल तेव्हाच तिला शिकवण्याचे मी ठरविले. एकदा अंक ओळख होण्यासाठी मी तिला झाडाची पाने आणायाला सांगितली. तिने बरोबर १० पाने मोजुन आणली. तिला लेखन करता यावे म्हणून मी तिला पटांगणातील मातीमध्ये अंक लिहिण्याचा सराव घेत होते. मी तेथील माती आपल्या हाताने सरकावत असतांना सुहानी मला म्हणाली “मैडम तुमी नका करू न जी तुमचे हात खराब होतीन न” थांबा मी पानी घेवून येतो” माझ्या डोळ्यात पाणी आले .केवळ माझे हात खराब होवू नये म्हणून ती माझी इतकी काळजी घेत होती .परंतु तिचे आयुष्य खराब होवू नये म्हणून मी किती काळजी घेते आहे ? या विचाराने मी अस्वस्थ झाले .माझ्यातील शिक्षक मला हिणवू लागला .ते छोटासं लेकरू माझ्या काळजीपोटी अस्वस्थ होते आणि मी.....सुहानी आनंदात मातीत अंक गिरवू लागली . हे करत असतांना तिने वर्गातील मेघाला जोराने आवाज दिला “ये मेघे इकड ये मी तुले शिकवतो ९ ,५, ७ ,८ ,१० कसे लिवतेत”. तिचा हा अतामविश्वास बघून मी चकित झाले . तीला जणू सोनेच गवसले की काय अश्या प्रकारचा आविर्भाव तिच्या चेहर्यावर होता. तिला शिकणे आवडू लागले होते .यानंतर तिला शिकण्यापासून प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा परावृत करू शकणार नाही यावर माझा ठाम विश्वास बसला . आता सुहानी दोन अक्षरी शब्द वाचू लागली आहे. दोन अंकी संख्येची बेरीज करते .हळूहळू तिची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. सुहानी सारखे कितीतरी विद्यार्थी आपल्या वर्गात असतील पण आपण त्यांना मंद आहेत असं म्हणून सोडून देतो .खरं तर मला असे वाटते ते मंद नाहीत तर आपली त्यांना समजून घेण्याची गती मंद आहे . प्रत्येक मुलात उपजत क्षमता असतेच .ती क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे त्यासाठी मूल समजून घेणे आवश्यक आहे . मुले कुठेच कमी पडत नसतात तर आपण स्वतः व आपली शिक्षणव्यवस्था काही अंशी कमी पडत आहे. मला वाटते , प्रत्येक शिक्षकाने शाळेतील प्रत्येक मुलाला ते आपले मूल आहे असे समजून-उमजुन वागले तर सर्व प्रश्न आपोआप सुटतील . ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाच्या प्रत्येक कृतिला सहज स्वीकारतो. त्याला समजून घेतो . त्याची चूक सुद्धा हसत स्विकारुन ती कशी सुधारता येईल यावर लक्ष देतो . त्यासाठी वाट्टेल तसा अटापिटा करतो. त्याला तळहातावरील फोडासारखे जपतो . अगदी तसेच वर्गातील प्रत्येक मुलांची काळजी घेणे, त्याच्या भावना जपणे हे   शिक्षक म्हणून आपले प्रथम कर्तव्य आहे असे मला वाटते . एकदा मुलांवर आपले प्रेम जडले तर सर्व मार्ग  सहज खुलत जातात . मुलेही आपल्यावर प्रेम करू लागतात . आपली काळजी घेतात . प्रेम दिले तर प्रेम मिळते , काळजी घेतली की मुलेसुद्धा आपली काळजी घेतात . सुहानी च्या संदर्भात सुद्धा तेच दिसून येते जेव्हा तिला प्रेमाने जवळ केले तेव्हा तिची प्रगती खूप गतीने होत असल्याचे दिसले .एकदा तर ती मला गप्पा मारताना म्हणाली "दुसऱ्या वर्गात मला मीना मैडम काई खूप लाड़ करे न" . मी समजले तिच्या अप्रगत नावाच्या रोगावर प्रेम हे औषध काम करू शकते .सोबत रचनावाद, ABL ‍या सारखी औषधे द्यावी लागतीलच . परंतु सुरुवात मात्र प्रेम नावाच्या गोळीने करावी लागणार . प्रेमाकडून तिचा श्रमाकड्चा प्रवास आता सुरु झालाय. तिचा हा प्रवास निरंतर चालणारा आहे . सुहानीने शिक्षक म्हणून मला अधिक समृद्ध केले असे मला आवर्जुन सांगावेसे वाटते. म्हणून पंढरीच्या वारी पेक्षा असते प्रेमाची जादू न्यारी...... -कल्पना बनसोड चंद्रपुर




इइ

Thursday 22 October 2015

सुलभक:नितीन खंडाळे सर,जि.प.प्रा.शाळा भोरस,ता.४०गाव,जि.जळगाव

* स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही !!!

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..

(नितीन खंडाळे,

जि.प.प्रा.शाळा भोरस,ता.४०गाव,जि.जळगाव)

सरकारी शाळा म्हटल्या की सर्व समाज सुधारण्याचा शिक्षकांनी जणू मक्ताच घेतलेला.मुलांना शिकवण्यापासून ते जनतेचे उद्बोधन करण्यापर्यंत.
अर्थात असे फलक वाचून कितपत फरक पडतो कोण जाणे ??? पण शासन आदेश करणे भाग !!
खेड्यात पेंटर उपलब्ध न होणे,झाल्यास अव्वाच्या सव्वा मजुरी सांगणे यावर आम्ही काढलेले हा उपाय !!
माझे अक्षर चांगले नसल्याने मी व्हाईट वाॅश मारण्याचे बिगारी काम तर आमचे सहकारी शिक्षक सुकदेव देवरे यांनी लेखनकाम व त्यांना ज्ञानेश्वर देवरे यांनी अधिक सहकार्य केले आणि मधल्या सुटीतील वेळ सत्कारणी लावला !!!



"पाण्यात विरघळणारे पदार्थ"

पाण्याचे गुणधर्म अभ्यासतांना पाण्यात काही पदार्थ विरघळतात हे दाखवण्यासाठी मीठ,साखर व रांगोळीचा वापर केला.हे पदार्थ पाण्यात टाकून चमच्याने ढवळले असता मीठ व साखर पाण्यात विरघळले तर रांगोळी न विरघळता तळाशी जमा झाली हे निरीक्षणाने सिद्ध झाले !!!!

** पाण्याच्या अवस्था **

इ 3 रीच्या परीसर अभ्यासातील 'पाण्याविषयी आणखी काही' यात पाण्याच्या अवस्था-स्थायू,द्रव व वायू याचे स्पष्टीकरण देतांना बर्फ(स्थायू) आणून त्याचे पाण्यात(द्रव)रुपांतर होतांना तसेच थंड ग्लासाच्या बाहेरुन बाष्प(वायू)चे पुन्हा पाणी(द्रव)होतांना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे समजून घेतले !!

निरीक्षण करताना चिमुरडे

"पाण्याविषयी आणखी काही"


इ 3रीच्या परीसर अभ्यासातील या पाठात पाण्याचे गुणधर्म समजून देतांना पाणी हे 'पारदर्शक' असते व जशा भांड्यात ठेवले तसा आकार धारण करते हे सिद्ध करण्यासाठी वर्गातील मुलाची पाण्याची बाटली,खडू व कचराकुंडीचे पसरट झाकण याचा वापर करुन समजावले !!!



उपलब्ध साहित्याचा वापर करुन अध्ययन अनुभव देता येऊ शकतात,त्यासाठी शै साहित्य विकत घेतलेच पाहिजे असे नाही !!

** चौकटीतील गंमत **


इ.3 रीच्या परिसर अभ्यासातील 'दिशा आणि नकाशा' या पाठात मुख्य दिशांची ओळख व त्याआधारे नकाशा काढणे ही कृती दिलेली आहे.काल मुख्य दिशा झाल्यावर आजच्या उपक्रमासाठी प्रत्येकाने आपापल्या घराच्या कोणत्या बाजूस 'सूर्योदय' होतो हे पाहून यायला सांगितले....
आज पाठातील 'चौकटीतील गंमत' ही कृती घेतांना प्रत्येकाने घराच्या ज्या बाजूस सूर्य उगवतो तिकडे पूर्व दिशा लिहून त्याआधारावर इतर दिशा लिहील्या.तसेच शेजारची घरे,दुकान,झाड,रस्ता इ. दिशेनुसार नकाशात काढले.
नंतर पुस्तकातीलच 'दिशांचा खेळ' घेतला.मुलांना वर्तुळाकार धावायला लाउन मधेच एका दिशेचे नाव घ्यायचे व सर्वांची तोंडे त्या दिशेला झाली पाहिजे.यामुळे मुलांची दिशा ओळख पक्की होते .....
पाठ्यपुस्तकातील कृति,उपक्रम तसेच स्वाध्याय शाळेतच पूर्ण करुन घेतले तर मुलांनी घरी अभ्यास नाही केला तरी चालते असे मला वाटते !!!!

Wednesday 21 October 2015

सुलभक:सुधीर मोहारकर सर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर.

सुधीर मोहारकर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर.

●●वर्गभोजन भाग-१●●

गोष्ट तशी मागील आठवड्यातिल पण फारच रुचकर बरं का. मला आठवते परिसर अभ्यास भाग १ मधील एक पाठ शिकवत होतो 'आहाराची पौष्टिकता' .यातील घटक 'प्रमुख अन्नपदार्थ' व 'अन्नपदार्थातिल विविधता ' समजावून देत असताना विविधता कशी असते यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांची व काही नास्ट्याच्या पदार्थांची नावे सांगत असताना त्यातील घटकही सांगत होतो। तेव्हा असे लक्षात आले की यातील बऱ्याच पदार्थांची नावे मुलांनी अजुनही ऐकली नव्हती किंवा पाहिलिही नव्हती तेव्हा खाणे तर दूरच राहिले। परंतु काही मुलांना त्यातील नावे चांगलीच परिचयाची होती तसेच काहींनी त्यांचा आस्वाद घरी अथवा बाहेर घेतलेला होता। मला अचानक तेव्हा एक कल्पना सुचली की ज्याच्याने जमेल त्यांनी त्यातील एखादा पदार्थ त्यांच्या घरी बनवून मागायचा (त्याची गरज व पार्श्वभूमी आधी घरी सांगायची)व वर्गात आणून सर्वांनी गोपाल काल्या प्रमाणे सर्वपदार्थांचा आस्वाद घ्यायचा व त्यातील घटकांची ओळख करून घ्यायची। मी म्हणालो की येणाऱ्या बुधवारी आपण त्याचे प्लानिंग करुया। पण वाटते काही मुलांना बहुतेक प्लानिंग म्हणजे समजलं नसावं। मी वर्गात गेल्यावर बऱ्याच मुलात चुळबुळ सुरु दिसली ।मला काहीच समजत नव्हतं । तेव्हा मुलेच म्हणाली की निधि ,पलक व चेतन ने काहीतरी घरून बनवून आणलं आहे। मला काहीच समजत नव्हतं मग मीच त्यांना विचारलं तेव्हा ते बोलते झाले व म्हणाले की सर तुम्ही सांगितल्या प्रमाने आम्ही घरून पदार्थ बनवून आणले पण बाकिच्यांनी काहीच आणलं नाही ।(इतरांनी काहीच आणलं नसल्याने त्यांचा हिरमोड झाला असावा बहुतेक.) मी म्हणालो की आज सांगणार होतो केव्हा बनवून आणायाचे ते आणि तुम्ही आजच कसे आणलात? बरं जावू दया। आधी पाहु तर दया काय आणले ते.बघतो तर काय निधिने डबाभर पोहे(आलू पोहा) पलकने पकोड़े (भजी) व चेतनने सुद्धा पकोड़े आणले होते ।त्यांचा खमंग वास सुटला होता। मी आधीच (उत्सुकतेपोटी) चव घेवुन बघितली ।खुपच टेस्टी झाले होते सर्व। मी मुलांना त्यातील घटक कोणते ते सर्व समजावून सांगितले। मग आता या पदार्थांचे करायचे काय ?मुलेच विचारू लागली म्हणजे बहुतेक त्यांना सुद्धा खावुन बघायचे होते। पण इतकेसे 35 मुलांना पुरणार तरी कसे? मी सुद्धा विचार केला व म्हणालो की सर्वांनाच मिळणार पण प्रसादासारखे कबुल.सर्वांनी होकार दिला। मग ज्यांनी पदार्थ आणले होते त्यांनी सर्वांना थोड़े थोड़े पुरवले। सर्वांनी आस्वाद घेतला पण मनसोक्त नाही। मग मीच म्हणालो पुढच्या बुधवारी शक्य तेवढ्या मुलांनी असेच पदार्थ बनवून आणा मग आपण वर्गभोजनच घडवून आणू। सर्व मुले होय म्हणाली व ही मुले पण डबल(दुसर्यांदा)आणणार आहेत। मी मात्र वाट पाहत आहे येणाऱ्या बुधवारची (21/10/2015 ची)...
..
Sudhir Moharkar
जि.प.प्रा.शाळा केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर

●●●© वर्गभोजन :भाग 
©2●●●

ठरल्याप्रमाने आज कोण कोण घरून खाद्यपदार्थ बनवून आणणार याचीच उत्सुकता होती। वर्गात गेल्यावर मात्र काही मुलांचे चेहरे बघता कुठे टवटवी तर कुठे हिरमुसलेपणा जाणवत होता। हाजरी घेतल्यावर मुळ मुद्यालाच हात घातला । चला या बरं समोर,कोण काय आणलं ते पटकन सांगा . मात्र पाच -सहा मुलांनिच काहीतरी बनवून आणले आणले होते। बऱ्याच मुलांच्या आयांना वेळ मिळाला नाही तर बऱ्याच मुलांचे पालक सोयाबीन काढनी वा इतर मजूरीसाठी बाहेर गावी गेलेले त्यामुळे बऱ्याच मुलांकडे काहीच नव्हते ।त्यामुळेच बऱ्याच मुलांचे चेहरे पडलेले असावेत कदाचित। असो।
काही मुलांनी आजही पोहे ,भजी(पकोड़े) तर काहींनी उपमा आणलेला त्यामुळे आज पदार्थात विविधता मात्र होती। आजही मागच्या आठवड्याप्रमाने पदार्थातील घटकांची माहिती समजावून सांगितली। नेहमीप्रमाने पहिला घास मीच खावुन बघितला ।सर्व पदार्थ छान झालेले होते। सर्व मुलांना पदार्थांचे वाटप करण्यात आले। सर्वांनी आस्वाद घेतला व पुढच्या बुधवारी पुन्हा ज्यांनी आणलं नाही ते आणू म्हणाले। आता वाट बघतोय ते पुढच्या आठवड्याची...
Add caption
Sudhir Moharkar
Sudhir Moharkar
स्वराज्याचे तोरण बांधले हा पाठ शिकवताना तोरणा गडाची माहिती विकिपेडिया वरुन विद्यार्थी लिहिताना। सोबतच गडकील्ले चित्रे दाखवली। पराक्रमी सूर्याचा जन्म हा शिवरायांचा एनिमेटेड चित्रपट पाहताना विद्यार्थी।

Sunday 18 October 2015

सुधीर मोहारकर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर.


●वर्गभोजन●●
गोष्ट तशी मागील आठवड्यातिल पण फारच रुचकर बरं का. मला आठवते परिसर अभ्यास भाग १ मधील एक पाठ शिकवत होतो 'आहाराची पौष्टिकता' .यातील घटक 'प्रमुख अन्नपदार्थ' व 'अन्नपदार्थातिल विविधता ' समजावून देत असताना विविधता कशी असते यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांची व काही नास्ट्याच्या पदार्थांची नावे सांगत असताना त्यातील घटकही सांगत होतो। तेव्हा असे लक्षात आले की यातील बऱ्याच पदार्थांची नावे मुलांनी अजुनही ऐकली नव्हती किंवा पाहिलिही नव्हती तेव्हा खाणे तर दूरच राहिले। परंतु काही मुलांना त्यातील नावे चांगलीच परिचयाची होती तसेच काहींनी त्यांचा आस्वाद घरी अथवा बाहेर घेतलेला होता। मला अचानक तेव्हा एक कल्पना सुचली की ज्याच्यान्ने जमेल त्यांनी त्यातील एखादा पदार्थ त्यांच्या घरी बनवून मागायचा (त्याची गरज व पार्श्वभूमी आधी घरी सांगायची)व वर्गात आणून सर्वांनी गोपाल काल्या प्रमाणे सर्वपदार्थांचा आस्वाद घ्यायचा व त्यातील घटकांची ओळख करून घ्यायची। मी म्हणालो की येणाऱ्या बुधवारी आपण त्याचे प्लानिंग करुया। पण वाटते काही मुलांना बहुतेक प्लानिंग म्हणजे समजलं नसावं। मी वर्गात गेल्यावर बऱ्याच मुलात चुळबुळ सुरु दिसली ।मला काहीच समजत नव्हतं । तेव्हा मुलेच म्हणाली की निधि ,पलक व चेतन ने काहीतरी घरून बनवून आणलं आहे। मला काहीच समजत नव्हतं मग मीच त्यांना विचारलं तेव्हा ते बोलते झाले व म्हणाले की सर तुम्ही सांगितल्या प्रमाने आम्ही घरून पदार्थ बनवून आणले पण बाकिच्यांनी काहीच आणलं नाही ।(इतरांनी काहीच आणलं नसल्याने त्यांचा हिरमोड झाला असावा बहुतेक.) मी म्हणालो की आज सांगणार होतो केव्हा बनवून आणायाचे ते आणि तुम्ही आजच कसे आणलात? बरं जावू दया। आधी पाहु तर दया काय आणले ते.बघतो तर काय निधिने डबाभर पोहे(आलू पोहा) पलकने पकोड़े (भजी) व चेतनने सुद्धा पकोड़े आणले होते ।त्यांचा खमंग वास सुटला होता। मी आधीच (उत्सुकतेपोटी) चव घेवुन बघितली ।खुपच टेस्टी झाले होते सर्व। मी मुलांना त्यातील घटक कोणते ते सर्व समजावून सांगितले। मग आता या पदार्थांचे करायचे काय ?मुलेच विचारू लागली म्हणजे बहुतेक त्यांना सुद्धा खावुन बघायचे होते। पण इतकेसे 35 मुलांना पुरणार तरी कसे? मी सुद्धा विचार केला व म्हणालो की सर्वांनाच मिळणार पण प्रसादासारखे कबुल.सर्वांनी होकार दिला। मग ज्यांनी पदार्थ आणले होते त्यांनी सर्वांना थोड़े थोड़े पुरवले। सर्वांनी आस्वाद घेतला पण मनसोक्त नाही। मग मीच म्हणालो पुढच्या बुधवारी शक्य तेवढ्या मुलांनी असेच पदार्थ बनवून आणा मग आपण वर्गभोजनच घडवून आणू। सर्व मुले होय म्हणाली व ही मुले पण डबल(दुसर्यांदा)आणणार आहेत। मी मात्र वाट पाहत आहे येणाऱ्या बुधवारची (21/10/2015 ची)....................

Saturday 17 October 2015

सुधीर मोहारकर,जि.प.प्रा.शा.केळझर,ता.मुल,जि.चंद्रपुर

हा माझ्या वर्गातील एक नमूना विद्यार्थी। महेश हरिदास निकोडे तसा लाडकाच पण महाबिलंदर । अभ्यासात जेमतेम पण इतर उपक्रमात त्याचा हात कोणी पकडणार नाही। विशेष म्हणजे याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही। त्याला वाचनाचा भारी कंटाळा । झाडावर चढायला सांगा ,एका पायावर तयार! कुस्ती ,कबड्डी खेळायला सर्वात पुढे हजर। पतंग उड़वने म्हणजे डाव्या हाताचा मळ .शाळेत बैडमिंटन खेळाचे साहित्य आहे, इतर मुलांसोबत खेळुन त्यात इतका पारंगत झालाय की इतर चैम्पियन मुले त्याच्या समोर टिकूच शकणार नाही। तो वर्गात नसला की वर्ग कसा सुना-सुना वाटतोय। गेली दोन दिवस तो वर्गात दिसला नाही। कोणी म्हणे तो परगावी गेलाय.तर कोणी म्हणे तो गावात फिरत आहे तर कोणी म्हणे तो दंडात( शेतात) गेला आहे। तिसऱ्या दिवशी हजेरी घेताना पुन्हा त्याचे दर्शन झाले नाही तेव्हा मीच त्याच्या शोधात त्याच्या घरजवळच्या दुसऱ्या मुलाला बाइकवर बसवून निघालो। घरी त्याचे आजोबा व एक दोन ओळखिचे व दोघे अनोळखी माणसे गप्पा मारत अंगणात बसली होती। त्यात आमच्या smc चे माजी अध्यक्ष पण होते। मी महेशच्या आजोबाला विचारले,"पाटिल ,नातू कोठे गायब झालाय तुमचा? गेल्या दोन दिवसापासून शाळेत आला नाही?" आजोबा म्हणाले,"गुरूजी ,काय सांगू तुमाले रामायण आता। तो आता दंडात गेला असन आजीबरोबर ." बरीच चर्चा केल्यानंतर असे समजले की त्याचे वडील सोयाबीन कापणीसाठी मजुरीने दूरच्या ठिकाणी गेले होते। त्यापूर्वी आई व वडिलांच्या दोन दोन गोष्टी झाल्या असतील बहुतेक त्यामुळे आई महेशच्या बहिणीला(2 रा वर्ग) घेवुन रागाने माहेरी निघून गेली। याला पण घेवुन जाणार होती पण पठ्ठा सकाळीच आजीसोबत शेतात गेला होता। घरी कोणीच नव्हते। बरं गेली तर गेली दाराला कुलूप लावून गेल्याने महेशचे कपडे व शाळेचा दप्तर आतच ठेवला । याची मोठी पंचायत झाल्याने हा नाराज होता । आजोबाकडेच राहत होता। याला खूप राग आला होता बहुतेक ,कारण की हा दाराचे कुलूप पण तोडायला निघाला होता असे समजले पण आज्याने(आजोबा) त्याला मनाई केली.(बहुतेक आई पुन्हा चोरीचा आळ घेईल असे त्यांना वाटले असावे.) आज्याने त्याला दंडातुन बोलावून आणले। तेव्हा त्याचा अवतार पाहण्यालायक होता.अंगावर पांढरा पैंट आणि पांढरीच टी शर्ट पण मातीने लालेलाल झालेले. तो मला पाहताच हुंदकेच द्यायला लागला । आजा म्हणाला,"अशी गत करून ठेवला जी पोराची,आता कसा येईल शाळेत? पाटी नाही ,पुस्तक नाही वरुन कपड़ेही नाही। रात्री आजी धुवून देते व सकाळी तेच ते कपडे घालते। रात्री दुपट्टी लावून पोरगा झोपते". मला त्याचे शाळेत न येण्याचे कारण लगेच समजले की केवळ दप्तर व कपडे नसल्याने तो येवू शकत नव्हता। मी त्यांना समजावलं व् महेशचेही सांत्वन करून आहे त्याच कपड्यावर शाळेत यायला सांगितले। तो एक पायावर तयार झाला। माजी smc अध्यक्षांनी लगेच त्याच्या मामाला मोबाईल वरुन फोन लावला पण नंबर आउट ऑफ़ कवरेज दाखवत होता । मी त्याला शाळेत घेवुन गेलो । त्याला जुनी पुस्तके व वह्या दिल्या।तो सर्व मुलात रमला देखिल पण असे किती दिवस चालणार???? आई वडिल भांडतात पण त्यात पिसल्या जातात ती बिचारी मुले। त्याच्या बहिणीचे काय होणार? ती किती दिवस शाळेपासुन दूर राहणार? मी वाट पाहतोय ते त्यांच्या आई वडिल परतण्याची..........


शब्दांकन:सुधीर मोहारकर,मुल,जि.चंद्रपुर.





सुलभक:भाऊसाहेब चासकर,जि.प.प्रा.शा.बहिरवाडी,ता.अकोले,जि.अहमदनगर...मुलांनी घेतली भाऊची मुलाखत.


...आणि वाचक म्हणून माझा पट उलगडत गेला!
 आमच्या बहिरवाडी (ता. अकोले, जि. नगर) शाळेतील निवडक मुलांनी 'माझे वाचन' या विषयावर माझी मुलाखत घेतली. एरवी आम्ही शिक्षक मुलांच्या परीक्षा घेतो. पण मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाताना त्यांना पचेल, रुचेल अशा भाषेत बोलताना आपणही चांगलेच कसाला लागतो, याची खोलवर जाणीव झाली आज. एक सामान्य वाचक म्हणून माझा प्रवास आज प्रथमच (माझा मलाही) उलगडत गेला! आपल्या वाचनाविषयी आपण काहीच विचार केला नव्हता. वाचनाला कोणतीही 'शिस्त' वगैरे नव्हती. कथा, कादंब-या, कविता, चरित्र- आत्मचरित्र, वैचारिक, ललित, निरनिराळी नियतकालिके असे जमेल तसे, वाटेल तसे फक्त वाचत गेलो. तसा मी काही अजिबात पट्टीचा वाचक-बिचक नाही. अभावग्रस्त परिस्थितीत लहानाचा मोठा झालो. पुस्तके वाचायची असतात हे सांगायला कोणी भेटले नाही! पुलाखालून पाणी वाहून जाते इतक्या सहजतेने आयुष्याची अठरा वर्षे गेलेली... वाचायची, लिहायची 'परंपरा' नसलेल्या घरात जन्माला आलो. 'First generation learner' असल्याने घरात पहिले पुस्तक विकत स्वतः विकत घेण्यापासून स्वतःचे लहानसे ग्रंथालय आकाराला आल्याचा प्रवास मुलांना सांगताना अनेक किस्से, प्रसंग जिवंत झाले. घरात वीज नव्हती. देहभान विसरून दिव्याच्या मंद उजेडात ययाति वाचताना डोक्याचे केस जळाले होते! गाईगुरांमागे हिंडताना गाई रानात हुस्कावल्या. एका झाडाखाली काहीतरी वाचताना गढुन गेलो होतो. गाई एकाच्या शेतात घुसल्या. पिकाचे नुकसान केले. भांडण थेट घरी आले! हरवलेले संचित गवसावे तसे झाले. मन पाखरू झाले. आठवणींच्या प्रदेशात विहार करत राहिले. यानिमित्ताने मलाही माझ्या 'स्वत्वाचा' शोध लागत होता! मुलांचे काही प्रश्न:- (कदाचित हे वाचणाऱ्या कुणाला बाळबोध वाटू शकतील!)
 वाचनाची आवड कधी, कशी निर्माण झाली? 
आतापर्यन्त कोणकोणती पुस्तके वाचली? 
 आवडीचे, नावडीचे पुस्तक कोणते? का? 
 वाचनाचे फायदे कोणते झाले? 
 मुलांनी काय काय वाचले पाहिजे? 
शिक्षक सोडून दुसरी कुठली तरी नोकरी करावी असे वाटले नाही काय? 
 लेख लिहायला सुरुवात कशी झाली? 
कोणी शिकवले? 
 लेख लिहायला (विषय) कसे सुचतात? 
मोबाईल मुळे वाचन कमी झाले काय? 
आतापर्यन्त किती पुस्तके वाचली? 
वाचन कधी करता? 
भाषण करायला कसे शिकले? 
कोणी शिकवले का?
  ...
असे अनेक प्रश्न विचारले मुलांनी. एक प्रकारची माझी तोंडी परीक्षाच होती. यानिमित्ताने मला माझ्यात डोकावता आले. आपले वाचन बरेच कमी झाल्याची जाणीव मघापासून छळतेय. पण माझ्या मुलाच्या रूपाने माझी पुढची पिढी सकस आणि दमदार वाचन करते आहे, याचे अप्रूप आणि आनंद आहे! तिसरीत असताना वाचू लागलेला अगस्ती तर दहावीत असताना ब्लॉगर झालाय! त्याची स्वतःची स्वतंत्र ग्रन्थसंपदा आहे.

 शब्दांकन:भाऊसाहेब चासकर (भाऊ),,बहिरवाडी.

Friday 16 October 2015

सुलभक:मा.प्रतिभाताई भराडे,शिक्षण विस्तार अधिकारी,कुमठे बीट,जि.सातारा...रचनावादी अध्ययन अनुभुतींचे माहेरघर- कुमठे बीट

मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही ... 
 ज्ञानरचनावाद ??? १)भराडेमॅडम  यांनी ppt च्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते. मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते. इंग्रजी भाषा instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word one sentence one question असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे. वर्गतयारी मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम
१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.
२)चित्रगप्पा मारणे
३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.
४) न ठरवता गप्पा मारणे.
५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.
६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
 हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहारात टाकल्या जातात. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आले तरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
source-
http://ezpschool.blogspot.in/

उपक्रम
भाषा
)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित 
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

मुलं स्वत: शिकत आहेत...
सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर होतं. पण शिक्षकानं किंवा गुरूनं शिकविल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही हा मनावरचा संस्कार पुस्तकातलं हे वाक्य स्वीकारायला नव्हता. प्रत्यक्ष प्रयोग बघितल्याशिवाय त्या प्रयोगावर माझा विश्‍वास बसत नाही. सातार्‍याजवळच वाईमध्ये ‘भारत विद्यालय’ ही अरुण किर्लोस्कर यांची खाजगी शाळा रचनावाद राबवते असं कळल्यानंतर मी त्यांच्या परवानगीनं एका वर्गात तीन दिवस पूर्णवेळ ठाण मांडून बसले. स्वत: शिकणारी, न घाबरता बोलणारी, मुलांच्या दृष्टीनं सतत खेळणारी तर माझ्या दृष्टीनं सतत अभ्यास करणारी मुलं मला आव्हान देऊन गेली. शिक्षणक्षेत्रात काम करायचं असेल तर ‘मेंदू शिकतो कसा?’ हे कळलं पाहिजे हे याच शाळेत मला पहिल्यांदा समजलं. रचनावाद व मेंदूशिक्षण याबाबत दोन व्याख्यानं कुमठे बीटमधील १३८ शिक्षकांसाठी आयोजित केली. निम्मा वर्ग दोन तासात बर्‍यापैकी झोपला. एवढा गहन विषय त्यांना पेलेना. तरुण शिक्षक (मनानं) समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण एकूणच अवघड दिसत होतं. ‘प्रयत्न तर करूया’ एक मन म्हणत होतं, तर दुसरं मन ‘आपण मुलांच्या आयुष्याशी तर खेळत नाही ना?’ अशा द्विधा अवस्थेत होतं. शेवटी शिक्षकांशी चर्चा करून, पहिलीचा नवीन वर्ग १४ जूनऐवजी १ मार्चलाच भरवायचा ठरवला. १ मार्च ते १ मे हे दोन महिने प्रयोग करू. प्रयोग अयशस्वी झाला तर जूनपासून ‘वर्तनवादी’ पद्धतीनं शिकवू असं ठरलं. मुलं शाळेत न येण्याची कारणं माहीत होतीच. शाळा व वर्ग यातलं वातावरण निरस असलं की मुलं, शिक्षक, समाज सगळेच शाळेपासून पळून जातात. त्यासाठी प्रथम शाळा सुंदर करायच्या ठरल्या. पहिली मोहीम शाळेला पांढरा शुभ्र रंग देणं, शाळा परिसरात खेळणी उभी करणं आणि गुरं न खातील अशी जास्तीजास्त झाडं लावणं. कामाला झटून सुरुवात झाली. रंग झाला, खेळणी उभी केली. दोन शाळांतली खेळणी दुसर्‍या दिवशी चोरीला गेली. वृक्षलागवडीचंही तसंच. जकातवाडी शाळेत झाडं लावली की नेहमीच कोणीतरी उपटायचं. यावर्षी रानटी झाडं लावली आहेत. आज शाळा हिरवीगार दिसते आहे. शाळेत बिनखर्चात खेळता येतील असे खेळ घ्यायचं ठरलं. वर्गात बांधून बसावं लागतं म्हणूनही मुलं शाळा सोडत असतात. त्यासाठी त्यांना हवं तेव्हा खेळायला द्यायचं. मुलं शिकत राहतील अशा खेळांची यादी तयार केली. सागरगोटे, गोट्या, काचाकवड्या, सूरपाट्या, कांदाफोड, आबाधुबी यांसारखे पन्नास खेळ, हस्तनेत्र समन्वय, शरीराचा समतोल साधता येणं, एकाग्रता वाढणं, बैठक वाढणं या गोष्टी मुलांना खेळातून साध्य करता आल्या. खेळातून ‘मेंदू-विकास’ही करता आला. निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी खेळाची खूपच मदत झाली. हे दोन महिने खेळ, परिसरअभ्यास, वर्गसजावट, रांगोळी काढणं, चित्र काढणं यांमध्ये गेले. मूल शिकतं कसं हे समजण्यास हे दोन महिने उपयोगी पडले. हा बदल शिक्षकांच्या दृष्टिकोनात होता. मुलांना मारायचं नाही, त्यांना लागेल असं बोलायचं नाही, त्यांच्यात चांगला बदल कसा घडतो हे बघत त्यांना प्रोत्साहन द्यायचं असं ठरवणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं वेगळं. अंमलबजावणी करताना किती तारांबळ होते ते अनुभवलंं, कळलं. ‘हुशार’, ‘ढ’ हे शब्द अजूनही मनातून निघालेले नाहीत. पहिलं एक वर्ष तर ‘असं बोलायचं नाही’ असं एकमेकांना सांगण्यात गेलं. संयम हा गुण शिक्षकात असल्याशिवाय ‘रचनावाद’ राबवता येत नाही हे नक्की. मूल प्रत्येक गोष्ट स्वत: शिकेपर्यंत वाट बघणं ही खूपच त्रासाची गोष्ट होती. पण हळूहळू आम्हाला कळतंय की, ‘शिकताना चुकणं ही शिकण्याची पायरी आहे’. रचनावादाची तयारी करताना एकेका मुददयासाठी कोणकोणतं साहित्य तयार करावं लागेल याची यादी तयार केली. साहित्य तयार करण्यासाठी कच्चा माल एकत्र खरेदी केला. एकत्र बसून साहित्य तयार केलं. प्रत्यक्ष वापर करताना वेगळाच अनुभव आला. मुलांना स्वत:हून वाचता यावं यासाठी खूप कष्ट व खर्च करून पाच हजार ‘शब्दचित्र-कार्ड’ तयार केली. प्रत्यक्षात दीडशे ते दोनशे शब्द मुलांना व्यवस्थित वाचता आले की मुलं गोष्टीची पुस्तकं वाचू लागतात हा शोध नंतर लागला! ज्या शिक्षकांना ‘मूल स्वत:हून शिकतं’ हे समजलं तिथले वर्ग वेग घेऊ लागले. ऑगस्टपर्यंत पेन्सील-पाटी हातात दिली नाही तरीही मुलं गणन करू लागली. खडे, चिंचोके मणी यांच्या मदतीनं त्यांना व्यावहारिक गणितं पटपट येत होती. एखाद्या मुलाचं चुकलंच तर दुसरी मुलं मदत करत होती. शिक्षकांनी मुलांचं पूर्वज्ञान विचारात घेतलं, त्याचा फायदा मुलांइतकाच शिक्षकांनासुद्धा झाला. मुलांना माहिती होते पण शिक्षकांना माहिती नव्हते असे कितीतरी शब्द मुलं वर्गात सांगत होती. गोष्टीत लिहीत होती. मुलं धाडसी होत चालली होती. काहींना तो मुलांचा उर्मटपणा वाटत होता. माझ्या दृष्टीनं ती एकप्रकारे गुलामगिरीतून सुटका होती. रचनावाद राबवताना मला व माझ्या शिक्षकांना आमूलाग्र बदलावं लागलं. आज माझ्या बीटमध्ये ‘मुलं स्वत: शिकत आहेत.’


-शब्दांकन -प्रतिभा भराडे मँडम [विस्तार अधिकारी, कुमठे बीट, सातारा]

Tuesday 13 October 2015

सुलभक:श्री लोकरे गुरुजी,जि.प.प्रा.शा.निकमवाडी..ता.वाई,जि.सातारा

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील मानबिंदू-जि.प.प्रा.शा.निकमवाडी,ता.वाई,जिल्हा.सातारा
  (source:www.ranjitsinhdisaleblogspot.in)

साधारणपणे सन २००७ सालचा प्रसंग आहे.सिंधुदुर्ग जि.प. ने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले गुरुजी जिल्हा बदली होवून मूळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी निकमवाडी कडे निघाले.मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना गावकऱ्यांनी अडवले व या शाळेत रुजू न होण्याचा धमकी वजा प्रेमळ सल्ला दिला.गुरुजी निराश झाले.पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. रोज गुरुजी शाळेत जायचे अन गावकरी त्यांना अडवायचे.हा सिलसिला १५-२० दिवस सुरूच राहिला. यादरम्यान शाळेत दुसरे गुरुजी आणण्याचे पडद्यामागील प्रयत्न देखील सुरूच होते. मात्र गावकऱ्यांच्या प्रयत्नास अपयश आले. प्रशासनाच्या खंबीर भूमिकेने गुरुजी निकमवाडी शाळेत रुजू झाले. गुरुजी शाळेत रुजू झाले खरे; पण गावकर्यांनी हार मानलीच नव्हती. आता तर शाळेतील वस्तूच गायब होवू लागल्या.रोज एक वस्तू गायब होत . एक वस्तू गायब झाली कि ती वस्तू गुरुजी विकत आणत.आश्चर्य वाटेल गुरुजीना नळाच्या तोट्या तब्बल २० वेळा विकत आणाव्या लागल्या.पण गायब होने बंद झाले; कारण आता मोर्चा झाडांकडे वळला होता. गुरुजींनी लावलेली रोपे नष्ट करण्याचा प्रकार सुरु झाला. महिन्याभरात सारी रोपे नष्ट झाली.पण गुरुजींनी देखील हार मानली नाही. पुन्हा नव्याने रोपे लावतच राहिले.अस म्हणतात ना कि प्रत्येक समस्येवर काळ हाच उपाय असतो ; तस झाल. त्रास गावकरी थकले पण गुरुजी नाही.आपले कनाहीरीतच राहिले. ·
आता २०१५ सालच्या खालील प्रसंगाकडे नजर साताऱ्याचे एक खासदार ( फोनवरून) :
 नमस्कार गुरुजी मी खासदार ****** *** बोलतोय.
गुरुजी : बोला सरकार .
खासदार:माझ्या गावातली काही पोरं तुमच्या शाळेत दाखल करून घेतली नाहीत तुम्ही?
गुरुजी: साहेब , आम्ही बाहेरची मुल घेत नाही.
खासदार : ते काय सांगायचं नाय.पोर पाठवतो . त्यांला admisssion द्या.नायतर..............

 गुरुजी: देतो देतो सरकार..सरकार ·
आता प्रसंग दुसरा राज्याचे एक शिक्षण संचालक ( फोनवर) : गुरुजी , माझ्या २ पुतण्यांना तुम्ही दाखल करून घेतले नाही.
गुरुजी: साहेब, आम्ही बाहेरगावची मुले घेत नाही.
संचालक : ते मला सांगू नका , त्यांना admission द्या अन्यथा.........................
गुरुजी : देतो देतो साहेब.

आता वरील दोन प्रसंगाकडे नजर टाकली तर या शाळेत दाखल होण्यासाठी आमदार , खासदार , अधिकारी यांना शिफारस करावी लागते हे तुमच्या लक्षात आलेच असेल.( वरील प्रसंगातील काही आक्षेपार्ह बाबींकडे दुर्लक्ष करावे ही अपेक्षा..वरील प्रसंगात वारंवार उल्लेख झालेले गुरुजी आहेत--- लोकरे गुरुजी. अन शाळा आहे जि.प. शाळा, निकमवाडी ता.वाई जिल्हा . सातारा.
अगदी अचानकच या शाळेला भेट देण्याचा योग आला. जिथ भेटीसाठी केवळ २० मिनिटे द्यावी असा विचार होता त्या शाळेत तब्बल ४ तास रेंगाळत राहिलो.सायंकाळचे ६ वाजले तरी तिथून पाय निघत नव्हता.सातारा म्हटलं कि प्रतिभा ताईच्या कुमठे बीट ची आठवण येते.मात्र त्याच साताऱ्यात क्रमान्वित अध्ययन पद्धतीने अंशाकडून पूर्णाकडे या तत्वावर आधारित अध्यापन करून लोकरे गुरुजींनी केलेला बदल मात्र अविश्वसनीय आहे. चाकोरी बाहेर जात प्रयत्न करणाऱ्या गुरुजींना यश हमखास मिळते हे पुन्हा एकदा दिसून आले. अगदी प्रातिनिधिक स्वरूपात या शाळेतील १ ली च्या मुलांची ओळख करून देतो. एकूण पट: ३० भाषा विषयातील प्रभुत्व पातळी : पुनरावृत्ती, द्रोणाचार्य, वस्तुनिष्ठ यांसारखे कोणताही अवघड जोड शब्द वाचन, लेखन ही मुले करतात. ( ३० पैकी ३० ह) चित्रवाचन : मी जेंव्हा एक चित्र दाखवत त्यांना वर्णन करायला सांगितले तेंव्हा सर्वांनी मिळून एकूण 46 शब्द सांगितले. तुम्ही देखील चकित झाले असाल कि १ ली च्या मुलांना हे कस शक्य आहे? जादा तास घेत असतील गुरुजी? अंगणवाडी पासून तयारी असेल? ३६५ दिवस शाळा असेल? मुले निव्वळ घोकंपट्टी करत असतील? असे जे नानाविध प्रश्न तुमच्या मनात आले असतील , तर त्यांच उत्तर ‘नाही’ असेच आहे. आणि १ ली च्या वयातील मुलांना असे अभ्यासचे ओझे नको अस वाटणाऱ्या बालमानसशास्त्र अभ्यासकांनी देखील या शाळेस भेट देवून मुलांची तपासणी करावी. ही मुले ओझ्याने दमली आहेत अस प्रत्यक्ष दर्शनी बिलकुल जाणवत नाही. सध्यस्थितीतील सर्व विचार प्रवाहांना छेद देत लोकरे गुरुजीना त्यांची अध्यापन पद्धती विकसित केलीय.मुलांना केवळ अक्षर व अंक ओळख करून न देता त्यांनी मुलांना स्वर –व्यंजन यांतील नातेच उलगडून सांगितले आहे.शब्द तयार करण्यामागील रचना च मुलांना माहितीकरून दिली गेलीय त्यामुळे तर ती मुले अशी अविश्वसनीय कामगिरी करत आहेत. जी कथा मराठी ची तीच इंग्रजी ची देखील. तुम्हाला माहिती असलेला कोणताही शब्द विचारा ....ती मुल स्पेलिंग सांगणारच . त्यांना फोनेटिक्स ची ओळख करून दिलीय ना. त्यामुळे त्यांना अस कात्रीत पकडण कठीण आहे.तुमचे उच्चार मात्र अचूक असावेत ह गणित विषयात मात्र ही चिमुकली तुम्हालाच गोंधळात टाकतील. मी त्यांना खालील संख्या लिहून दाखवायला सांगितली . सव्वा दोन कोटी ही संख्या १० सेकंदाच्या आता १३ मुलांनी लिहून दाखवली. अन १ मिनिटामध्ये सर्व ३० जणांनी पूर्ण केली. संख्याशी खेळण्याची कला अवगत झालीय त्यांना. आता या सव्वा दोन कोटी मधील कोणत्याही अंकाची स्थानिक किमंत , दर्शनी किमत ते अचूक सांगतात.या संख्येवर बेरीज, वजाबाकी सारखी मुलभूत गणिती क्रिया ते लीलया करतात. हे सारंच अदभूत आहे.

हा लेख वाचून किती जण विश्वास ठेवतील हे माहित नाही ; पण प्रत्यक्ष भेट घेवून हा अनुभव घ्या. विचार करा अन प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने आश्वासक पाउल टाका. सर्वाना शुभेच्या. पुन्हा भेटूया.

शब्दांकन:
रणजितसिंह डीसले , बार्शी.

Monday 12 October 2015

सुलभक:शिक्षणतज्ञ मा. निलेश निमकर सर-काय आहे ज्ञानरचनावाद?


शिक्षणतज्ञ निलेश निमकर

ATF-MAHARASHTRA चे संकेतस्थळ

सुलभक:किशोर काठोले आणि टीम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोजने.

तानसा अभयारण्यात प्रत्यक्ष जाऊन साजरा केला वन्यजीव सप्ताह.
आपल्या  पाठ्यपुस्तकांमधे अनेक पाठ मानव  व निसर्ग  यांचे  नाते  सांगणारे  आहेत.  पण हे  पाठ बहुदा  पाठ्यपुस्तक व चार भिंतीच्या पलिकडे नाही जात.
ह्या  सगळ्या पलीकडे जायला हवे.  मी बर्‍याचदा संधी मिळेल तेव्हा वर्गाबाहेर जातोच. त्यातलाच  हा एक नमुनआमच्या मोज शाळेपासुन दिड किलोमिटर अंतरावर तानसा अभयारण्याची हद्द सुरू होते. दर वर्षी गावातील वनपाल शाळेत येऊन वन्यजीव सप्ताहा बद्द्ल शाळेत मुलांशी बोलायचे. या वर्षी आम्ही सर्व शिक्षकांनी मिळुन जरा वेगळ्या पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले.


गावातच राहाणाऱ्या वनपालांशी चर्चा केली. ठरल्या प्रमाणे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच शाळेतुन सर्व शिक्षक, वनपाल व ईयत्ता 5,6,7,8,ची सगळी मुलं जंगलात निघालो.  एरवी काहीना काही निमित्ताने जंगलात फिरणारी ही आमची मुलं आज भलतीच उत्साहात होती. काही अंतर चालल्या नंतर मधेच थांबुन वनपालांनी मुलांचे दोन गट केले व स्वतः मधे उभे राहुन मुलांना ते म्हणाले की एक गट हा राखिव जंगलात आहे तर एक गट संरक्षित जंगलात. पुढे त्यांनी प्रादेशिक वनांची माहिती देऊन आपल्या अभयारण्याचे क्षेत्र किती?, किती तालुक्यांत ते पसरले आहे? याची कल्पना दिली.


 पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. काही अंतर चालल्यावर एका झाडाच्या सावलीत सगळे जमलो.आता वनपालांनी वन्यजीवांची गणना कशाप्रकारे केली जाते?, हे सविस्तर समजावुन सांगीतले, त्याच्याच जोडीला पर्यावरण संतुलनासाठी वन्यजीवांचे अस्तित्व कसे महत्वाचे आहे यावर चर्चा झाली.  साधारण पणे जंगलाचा जास्तीत जास्त परिसर नजरेस येईल अशा एका टेकडीवर वनपालांची संरक्षक कुटी आहे तिथे सगळेजण पोहचलो. आता कुटीसमोरच्या झाडांच्या सावलीत बसुन पुन्हा गप्पांचा कार्यक्रम रंगला. जंगलातुन कशाप्रकारे रोजगार मिळतो?, कोणती वनौषधी उपलब्ध होते?, जंगल संरक्षण व जंगल आभ्यासाची काय गरज आहे?, मानव व निसर्ग यांचे काय नाते आहे?, या आणि ईतर अनेक विषयांवर वनपालांना मुलांनी बोलतं केलं. तिथेच शाळेतील शिक्षकांनी वनपालांचे आभर मानले आणि वनपालांनीही मुलांना पुन्हा जंगलात येण्याचे अव्हाऩ केले.

विद्य़ार्थ्यांच्या अल्पोपहारासाठी नेलेल्या खाउचे कागददेखील मुलांनी वेचुन घेतले. एकुणच जंगलात फिरतांना वन्यजीवांच्या या घरी आपण पाहुणे म्हणुन आलोय तर आपण येथे कसे वागावे याचा उत्तम पाठ मुलांनी आपल्या कृतीतुन दाखवला.  वृक्षवल्ली आम्हा सोयरे। या उक्ती प्रमाणे आपल्या सग्या सोयऱ्यांना आज प्रत्यक्ष भेटुन आल्याचा आनंद एवढं चालुन सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता.
























शब्दांकन- श्री.पुंढलीक पाटील,संजय फराड,गुरुनाथ काळे,सुरेश ठाकरे,रोहिदास वाघ,किशोर काठोले.

Friday 9 October 2015

सुलभक:फारूक एस.काझी. जि.प.प्रा.शाळा , अनकढाळ नं .1 ता.सांगोला , जि.सोलापूर


  
 जिवंत घड्याळ.... .. ..
आज सकाळी (दि. 10/10/2015) धावण्याची स्पर्धा झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे एक नवीन गणिती खेळ खेळण्याची वेळ होती. मुलांचा आग्रह असतो की जो भाग चुकतो तोच घ्यायचा. ... पायाभूत चाचणीत तोंडी परीक्षा घेताना असं लक्षात आलं होतं की काही मुलांना घड्याळ नीटसं समजलेलं नाही. त्यामुळे नेमके किती वाजून किती मिनीटे झाली? त्याला व्यावहारिक भाषेत काय म्हणायचं ? हे नीटसे समजलेले दिसले नाही. .. आज वर्गातलं घड्याळ सोडून आम्ही जिवंत घड्याळाचा प्रयोग करून पहायचं ठरवलं होतं. 12 मुलींच्या पाट्यांवर 1 ते 12 अंक लिहून त्यांना घड्याळातील अंकाप्रमाणे उभारायला सांगितलं. तसेच दोन अंकांच्या मधे पाच रेषा ओढत ओढत मिनीटांची सूचक खूण हे सांगितलं. .. तीन काट्यांची निवड करून त्यांना गोलात घेतलं. (साधारणत: घड्याळ गोलाकार असतं म्हणून आकार गोल घेतला) मुलांची उत्सुकता शिगेला पोचलेली. सेकंद काट्याला न सांगताच तो पळू लागला. कारण सेकंद काटा सतत पळत असतो. ह्यातून सेकंद अन मिनटाचा संबंध स्पष्ट करून सांगता आला. सेकंद काटा फिरत असताना मिनीट काटा त्याच्याबरोबर पुढे पुढे सरकत होता. .. .. यातूनच 1 मिनट = 60 सेकंद हे समोर पाहता आलं. मिनट काट्याबरोबरच तास काटा हा पुढे पुढे सरकू लागला. मिनीट काटा जेव्हा तीनवर गेला ते़व्हा तास काटा दोन अंकांच्या मधे येऊन थांबला. 30 मिनीटे = अर्धा तास हे समजून घेता आला. काही मुलांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह होतं...त्यांना तीच कृती पुन्हा करून दाखवली. .. 2 वाजून 30 मिनीटे यालाच व्यावहारिक भाषेत "अडीच वाजले" असे म्हणतात . आता अंक झालेल्या मुलीही उत्साहाने उत्तरं देऊ लागल्या हेत्या. .. पाहता पाहता सव्वा, अर्धा, पाऊण ह्यातून जाऊन पूर्ण वाजणे समजू लागलं. .. परंतु हे एवढ्याने थांबणार नव्हतं. @वर्गात चांगलं घड्याळ येणा-या मुलांनी घड्याळ न समजणा-या मुलांबरोबर जोडी बनवून "किती वाजले?" हा खेळ खेळावा. @काय आहे या खेळात ? आपल्या जोडीदाराला अधून मधून किती वाजले ? हे विचारत रहायचं. व्यावहारिक भाषेत त्याला काय म्हणायचं ? हे ही विचारायचं. जर समजलं नसेल समजाऊन सांगा. वर्गातील घड्याळाचा त्यासाठी वापर करता येईल. .. @घड्याळाशी संबंधित उदाहरणे. आज आम्ही तास मिनीटे हे रूपांतर घेतले. मुलांच्या चूका ग़ृहित धरून ही गणितं घेतली होती.आणखी दोन तीन तासिका यासाठी खर्ची पडतील.त्यानंतर बेरीज व वजाबाकीचा विचार करता येईल. .. 
अनुभव : 
1) आजच्या या जिवंत घड्याळाने घड्याळ केवळ भिंतीवर किंवा हातातच नाही तर समोर असं जिवंत आकडे अन जिवंत काट्यांच्या मदतीनेही शिकता येते ही मज्जा अनुभवली.
2) सेकंद,मिनीट व तास काट्यांची जिवंत कृती पाहून किती वाजून किती मिनीटे याचे कोडं सहजी सुटलं. दुसरीची मुलंही उत्साहाने भाग घेती झाली. 
3) व्यावहारिक भाषेत काय म्हणायचं ? हा ब-याचदा अडणारा मुद्दा आज जरा सोपा झाला.आणखी सरावाने तो अजून सोप्पा होईल.
4) रूपांतर ही औपचारिक क्रिया या अनुभवाला जोडून घेतल्याने ती फारशी जड वाटली नाही. मस्त एन्जॉय केलं त्यांनी ....माझ्यासकट
5) गणित शिकण्याच्या पध्दतीत याचा उपयोग करून मला गणिताच्या जवळ जाता आलं हे माझ्यादृष्टीने शिकणं होतं. 6) किती वाजले ? हा नवीन पाठ आम्ही पाठ्यपुस्तकात ॲड करतोय. सहजपणानं घड्याळ उलगडेल म्हणून.
7) हा अनुभव घेताना मुलांनी दाखवलेला उत्साह चकित करणारा होता. कोणताच विषय अवघड नसतो,त्रूट असते ती आपल्या पध्दतीत. आज ती थोडी बदलून पाहिली.(माझं शिकणं) .



. फारूक एस.काझी. जिपप्रा शाळा , अनकढाळ नं .1 ता.सांगोला , ज्.सोलापूर

Wednesday 7 October 2015

सुलभक:गजानन बोढे,जि.प.प्रा.शाळा भानुसेवस्ती,ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.


-गजानन बबनराव बोढे,सहशिक्षक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानुसेवस्ती (टाकळी जिवरग), 
Angles & Triangles (कोन व त्रिकोण) Std-5th(semi english medium) 
SSubject-Mathematics Unit-Angles & Triangle. 
Teaching aid-Ladder & Slide in the school yard.




Angles & Triangles (कोन व त्रिकोण) ह्या संकल्पनांच्या दृढीकरणासाठी मला पारंपारिक शैक्षणिक साधनांच्या तुलनेत शाळेच्या आवारातील घसरगुंडीचा वापर अधिक परिणामकारक ठरू शकेल असे वाटले.
चार भींतीच्या आड रोज त्याच त्या खडुफळ्यांचा वापर करण्याचा खरेतर मलाच कंटाळा आला होता.
ममग काय,"चला पोरांनो आवारात घसरगुंडीकडे..आपण काहीतरी शिकुया..!" असे म्हणून आवारात आलो..
पोरांना आपण नेमके काय शिकणार आहोत याची पूर्वकल्पना जाणीवपूर्वक दिलेली नव्हती..त्यामुळे पोरांच्या चेह-यावर कमालीची उत्सुकता दिसत होती.त्यांच्यातील शिकण्याच्या उत्सुकतेचा लाभ घेण्याचे ठरवून सुलभकाच्या भुमिकेतून पुढील कृतीचे आयोजन केले.
 पोरांकडून angle म्हणजे 'कोन' व triangle म्हणजे 'त्रिकोण' असे घोकुन न घेता घसरगुंडीचे दोन सरळ खांब म्हणजे line segments ज्या एकाच ठिकाणी परस्परांना जोडलेले आहेत त्या ठिकाणाकडे अंगुलीनिर्देश करुन त्यास vertex (कोनाचा शिरोबिंदु) व त्यामुळे तयार झालेल्या कोप-याला angle (कोन) म्हणायचे..असे पोरांना सुचवले. बस्स..मी फक्त एवढेच केले..मग पोरं स्वत:च घसरगुंडीच्या विविध भागात दिसणारे vertex व angles मला दाखवायला व सांगायला लागलीत..याचपद्धतीने पुढे Triangle व Elements of Triangle हे संबोध स्पष्ट केलेत.त्यासाठी खांबांवर खडुने रेषाखंड काढून घेतले व सोयीसाठी त्यावर points दाखवून त्यांना इंग्रजी A,B,C अशी नावे दिलीत व संबंधीत आकृत्यांचे वाचन कसे करायचे हे समजावून सांगितले..संबोध स्पष्ट झालेत कि नाही याची चाचपणी करण्यासाठी पोरांना वहीवर Angles व Triangles काढून त्यांचे विविध पद्धतीने वाचन व लेखन करावयास दिले...तपासणीअंती पोरांनी आकृत्यांचे अगदी अचूक वाचन/लेखन केल्याचे मला दिसले..हीच माझ्या अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती...

 या तासिकेत पोरांना पुढील बाबींचे आकलन झाले..  
1.Angles 
2.Elements of angle. 
3.Triangle 
4.Elements of Triangle. 
5.Different methods of reading/writing Angles & Triangles.

Tuesday 29 September 2015

सुलभक:सुरेश सुतार,जि.प.प्रा.शाळा बारे,ता.भोर,जि.पुणे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारे,ता.भोर,जि.पुणे. 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

वर्गातील मुले आणि मी...... 



आज आम्ही ( मी व इ.3 री व 6 वी ची मुले ) दुपारनंतर एक तास गावातील एका किराणा दुकानास भेट दिली.
तेथे दुकानदार काकांकडून मुलांनी खूप काही गोष्टी जाणून घेतल्या.जाण्याआधी थोडी पूर्वतयारी करूनच गेलो होतो.
गेल्यावर दुकानदार श्री.योगेश दानवले यांनी आमचे स्वागत केले..
नंतर मुलांनी खालील मुद्द्यावर प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.
● काकांचे नाव
●दुकानाचे नाव.
●दुकानातील वस्तूंची नावे.
●या वस्तू कोठून आणता .
●वस्तू आणण्यासाठी वाहतुकीचे साधन.
●दुकान व्यवसायात आणखी कोण कोण मदत करते .
●वस्तूंच्या किंमती. .... वगैरे वगैरे प्रश्न विचारून मुलांनी माहिती जाणून घेतली.
प्रत्यक्ष काही वस्तूंचे वजनही (साखर, डाळ, शेंगदाणे, कडधान्ये इत्यादी यांचे) केले ..... खरंच. ... मुलं या दुकानात कधी घरच्यांबरोबर कधी एकटी खरेदी च्या निमित्ताने आली असतील ही पण आज सर्वांबरोबरचा अनुभव त्यांचा खूप छान होता.. हे जाणवले.
दुकानदार योगेश काकांची अनौपचारिक मुलाखत ... चर्चा. .. काही प्रात्यक्षिक.... काही हिशोब... वगैरेंचा अनुभव या पाऊण एक तासात मुलांना आणि पर्यायाने मलाही खूप काही शिकवून गेला .
इ 3 री च्या परिसर अभ्यासातील घटकाच्या अनुषंगाने तसेच मुलांना गणिती क्रिया, हिशेब , दुकानातील व्यवहार वगैरे प्रत्यक्ष अनुभव आणि शिक्षण व व्यवहार यांची सांगड घालण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.... शेवटी काकांनी मुलांना त्यांच्या तर्फे चॉकलेट , बिस्किटे दिली मग काय ..मुले जाम खुश ..... काकांनी आम्हाला वेळ( आणि खाऊ) दिल्याबद्दल मुलांनी त्यांचे आभार मानले..... एक वेगळा छान प्रत्यक्ष अध्ययन अनुभव घेवून मुले(आणि मीही) आनंदात पुन्हा शाळेकडे आलो.

-सुरेश सुतार



Sunday 20 September 2015

सुलभक:गजानन बोढे,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती (टाकळी जिवरग) ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.


INTRODUCING LINE

Add caption
(September 14,2015) 
आज आम्ही (इयत्ता २ री चे विद्यार्थी) हे शिकलोत.
 *दोरी दोन्ही बाजूंनी ताणली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Straight Line.
 *ताणलेली दोरी सैल सोडली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Curved Line. ...................................................................................................................
.*ताणलेली दोरी आडवी धरली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Horizontal Line. 
*ताणलेली दोरी उभी धरली अन् तयार झालेल्या figure ला म्हटले...Vertical Line. 
 *ताणलेली दोरी तिरपी धरली अन् म्हटले...Slanting Line.

Tuesday 15 September 2015

Sliding & Rolling.

इयत्ता २ री (सेमी इंग्रजी).
घटक-SLIDING & ROLLING.
.................................................
इयत्ता २ रीच्या गणित पाठ्यपुस्तकात असलेले FLAT surface व CURVED surface हे संबोध विविध वस्तुंच्या सहाय्याने पोरांना आधीच समजावून सांगितले होते. पूर्वज्ञानाचा हाच धागा पकडून आपण आता काय शिकणार आहोत याची पूर्वकल्पना न देता मधल्या सुट्टीत घसरगुंडीजवळ खेळत असलेल्या लेकरांजवळ गेलो.इयत्ता २ रीतील पोरांपैकी एकाला घसरगुंडीवर चढण्यास सांगून आधी पुस्तक (an object with FLAT surface) घसरपट्टीवरून खाली सोडण्याची सुचना केली.
त्यानंतर एक खडू (an object with CURVED surface) आडवा ठेवून घसरपट्टीवरुन सोडण्यास सांगितले.या दोन भिन्न surfaces असलेल्या वस्तुंच्या घसरपट्टीवरून खाली येण्याच्या पद्धतीचे निरिक्षण करावयास सागून त्यात काही फरक दिसलाय का ते पोरांना विचारले..पोरं विचार करु लागलीत..शेवटी जीवनने अचूक निरिक्षण नोंदवले.तो म्हणाला,"सर,पुस्तक खाली येताना पट्टीला घासत आले,परंतु खडू मात्र गोल गोल फिरत पट्टीवरुन खाली आला..!"
...यावरुन घसरपट्टीवरुन/उतारावरुन एखादी वस्तू घासत येण्याला SLIDING अन् गोल गोल फिरत येण्याला ROLLING म्हणतात हे सांगितले...सोबतच FLAT surface असलेल्या वस्तू SLIDING करतात अन् CURVED surface च्या वस्तू ROLLING करतात
हे या कृतीदरम्यान पोरांच्या लक्षात आले ते पुढील प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनच काढून घेतल्यामुळे.
Q1-What surface do a BOOK have?
Ans by students-FLAT surface.
...................................................
Q2-BOOK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans by students-SLIDING करत.
...................................................
Q3-What surface do a chalk have?
Ans by students-CURVED surface.
...................................................
Q-4-CHALK घसरपट्टीवरुन कशा प्रकारे आले?
Ans-ROLLING करत.
...................................................
पोरांना हे संबोध समजलेत की नाही याची चाचपणी करण्यासाठी पुढील प्रश्न विचारले.
Q-5-SLIDING करत येणारे OBJECTS सांगा?
Ans by students-कंपासपेटी,फरशीचा तुकडा,वीट,वही...
...................................................
Q5-ROLLING करणारे OBJECTS सांगा.
Ans by students-बॉल,बैलगाडीचे चाक,पाण्याची बॉटल,जेवणाचा डबा,पोळ्या लाटण्याचे लाटणे.
...................................................
...अशाप्रकारे मधल्या सुट्टीत खेळासोबतच पोरांचे 'शिकणे'ही घडले.