** चौकटीतील गंमत **
इ.3 रीच्या परिसर अभ्यासातील 'दिशा आणि नकाशा' या पाठात मुख्य दिशांची ओळख व त्याआधारे नकाशा काढणे ही कृती दिलेली आहे.काल मुख्य दिशा झाल्यावर आजच्या उपक्रमासाठी प्रत्येकाने आपापल्या घराच्या कोणत्या बाजूस 'सूर्योदय' होतो हे पाहून यायला सांगितले....
आज पाठातील 'चौकटीतील गंमत' ही कृती घेतांना प्रत्येकाने घराच्या ज्या बाजूस सूर्य उगवतो तिकडे पूर्व दिशा लिहून त्याआधारावर इतर दिशा लिहील्या.तसेच शेजारची घरे,दुकान,झाड,रस्ता इ. दिशेनुसार नकाशात काढले. नंतर पुस्तकातीलच 'दिशांचा खेळ' घेतला.मुलांना वर्तुळाकार धावायला लाउन मधेच एका दिशेचे नाव घ्यायचे व सर्वांची तोंडे त्या दिशेला झाली पाहिजे.यामुळे मुलांची दिशा ओळख पक्की होते ..... पाठ्यपुस्तकातील कृति,उपक्रम तसेच स्वाध्याय शाळेतच पूर्ण करुन घेतले तर मुलांनी घरी अभ्यास नाही केला तरी चालते असे मला वाटते !!!!
|