Tuesday 15 September 2015

गंमतीदार अनुभव...इयत्ता १ लीतल्या चिमुकल्यांचा.

इयत्ता १ली (सेमी इंग्रजी) च्या लेकरांना Addition ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी 'power point presentation'प्रणालीद्वारे काही slides तयार केल्या अन् एलसीडी प्रोजेक्टरच्या मदतीने सादरीकरण केले.स्लाईड्स मधील apple च्या चित्रांना bounce हा animation effect दिलेला असल्याने प्रत्येक क्लिकनंतर एक एक apple चेंडुसारखे उसळ्या घेत घेत पडद्यावर स्थिर व्हायचे.दरम्यान जो गमतीदार प्रसंग अनुभवलाय तो संवाद स्वरूपात देण्याचा मोह होत आहे.
'3+2=5'
या उदाहरणात सर्वप्रथम 3 apples क्रमाक्रमाने उसळ्या घेत (पोरांच्या शब्दांत,'कुदत कुदत..')' पडद्यावर स्थिरावले..
माझा प्रश्न-count the apples..
विद्यार्थी(सामुहिक उत्तर)One apple..2 apples...3 apples..
नंतरच्या क्लिकवर plus हा शब्द पडद्यावर झळकला व पुढे परत 2 apples क्रमाने उसळ्या घेत अवतरले..
माझा प्रश्न-count the apples..
विद्यार्थी(सामुहिक उत्तर)-One apple,,2 apples..
...त्यानंतर त्यांनाच पडद्यावरील सर्व apples मोजण्यास सांगितले व मी प्रश्न केला,"How many apples altogether..?"
..लेकरं पुन्हा मोजायला लागलीत,"1 apple,2 apples,3 apples,4 apples,5 apples..!"
..हे सर्व सुरू असतांना 'is equal to'या शब्दांनंतर पुढील क्लिकवर क्रमाक्रमाने 5 apples उड्या मारत मारत पडद्यावर झळकले तेव्हा मी लगेच प्रश्न केला,"इथे 5 apples कसे आलेत...?"
यावर पोरांनी दिलेलं सामुहिक उत्तर,...."सर, 'कुदत कुदत' आले...!"

Dec 13, 2014.

No comments: